आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

​​​​​​​मतमाेजणी:जिल्ह्यातील 188 ग्रामपंचायतींच्या कारभाऱ्यांचा आज हाेणार फैसला

चांदवडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

येथील नवीन मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या सभागृहात मंगळवारी (दि. २०) तालुक्यातील ३४ ग्रामपंचायतींच्या मतमोजणीचे नियोजन तहसीलदार तथा प्राधिकृत अधिकारी प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. सरपंचपदाच्या ३३ जागांसाठी १०८ उमेदवारांचा व सदस्यपदाच्या ३१३ जागांसाठी ५०७ उमेदवारांच्या भाग्याचा फैसला होणार आहे. मतमोजणीसाठी १५ टेबलांवर ८ फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. मतमाेजणीसाठी एकूण ४५ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. एका फेरीत ४ ते ५ ग्रामपंचायतींचे निकाल हाती येणार आहेत.

३५ ग्रामपंचायतींपैकी नारायणगाव ग्रामपंचायत अविरोध झाल्याने ३४ ग्रामपंचायतींसाठी रविवारी मतदान पार पडले. मतमोजणीस मंगळवारी सकाळी १० वाजता प्रारंभ होणार आहे. दुपारी २ वाजेपर्यंत सर्व ३४ ग्रामपंचायतींचे निकाल हाती येण्याची शक्यता आहे.

बातम्या आणखी आहेत...