आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोविडकाळापासून वाइन विक्री आणि उत्पादनावर परिणाम झाल्याने उत्पादक आर्थिक गर्तेत सापडले होते, उत्पादकांना यातून बाहेर पडण्यासाठी पुन्हा अखिल भारतीय वाइन उत्पादकांनी बैठक घेतली. यामध्ये वाइन मार्केटिंगसाठी फेस्टिव्हलच तारणहार ठरणार असल्याचा निर्णय झाला. त्यामुळे राज्य शासनाच्या माध्यमातून वाइन प्रचार आणि प्रसिद्धीसाठी निधी आणि मार्गदर्शन घेण्यासाठी असोसिएशनच्या वतीने निर्णय घेण्यात आला.
आॅल इंडिया वाइन प्रोड्युसर असोसिएशनची सोमंदा वाइन यार्ड्स येथे वाइन उत्पादकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी नूतन कार्यकारिणी तयार करण्यात आली. अध्यक्षपदी जगदीश होळकर, उपाध्यक्षपदी प्रियंका सावे, सचिवपदी राजेश जाधव, खजिनदार राजेश बोरसे यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी डाॅ. नीरज अग्रवाल, सदाशिव नाठे आदी उत्पादक उपस्थित होते. बाजारात वाइनप्रमाणेच इतर फळांचे पेय बाजारात दाखल होत आहे.
तर आता राज्य शासनाने पाच लिटर वाइन पॅकिंगसाठी परवानगी दिली असून त्यामुळे वाहतूक व साठविण्यासाठी योग्य राहणार आहे. इटली देशात वर्षाकाठी ६०० कोटी लिटर वाइन तयार केली जाते, त्या तुलनेत भारतात १४० कोटी लोकसंख्या असून केवळ तीन कोटी लिटर वाइन तयार होते. यामध्ये दीड कोटी लिटर वाइन ही एकट्या नाशिक जिल्ह्यात उत्पादित केली जाते. मुंबई, पुणे, सुरत या शहरावर विक्रीवर अधिक लक्ष केंद्रित करण्यासाठी बैठकीत निर्णय घेण्यात आला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.