आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामानवी जीवनात आरोग्याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. रुग्णालयांमध्ये वैद्यकीय अधिकारी उपचार करत असताना परिचारिका रुग्णांची सेवा करतात. प्रत्यक्ष अविरतपणे रुग्ण सेवा करत माणुसकीचे नाते जोपासण्याचे काम परिचारिकांच्या माध्यमातून होत असल्याचे गौरवाद्गार सामान्य रुग्णालयाचे उपअधीक्षक डॉ.हितेश महाले यांनी काढले.
आंतरराष्ट्रीय परिचारिका दिनाचे औचित्य साधून गुरुवारी सकाळी सामान्य रुग्णालयात कार्यरत परिचारिकांचा रोटरी क्लब ऑफ मालेगाव मिडटाऊनतर्फे गौरव करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. कोरोनासारख्या गंभीर परिस्थितीत सतत रुग्णांच्या संपर्कात राहून त्यांची सुश्रूषा करण्याचे धाडस कुटुंबीय करत नसताना परिचारिकांनी सेवा दिली. संसर्गजन्य साथीचे आजार असो किंवा एखादी गंभीर परिस्थिती तरीही परिचारिका व आरोग्य कर्मचारी स्वत:च्या जीवापलिकडे जाऊन सेवा देण्याचे काम करत आहेत. या कार्याची दखल घेत रोटरीसारख्या संस्थेतर्फे त्यांचा गौरव होणे ही बाब निश्चित प्रेरणादायी असल्याचे डॉ. महाले यांनी स्पष्ट केले.
रोटरीचे अध्यक्ष राजेंद्र दिघे यांनी परिचारिका दिनाचे महत्त्व विशद केले. याप्रसंगी परिचारिका रेखा माळी, सुनीता बैरागी, कल्पना वळवी, गोरखबाई सोनवणे, सुलभा वाघ, लता त्रिमाळी, मोहिनी कुलकर्णी, वर्षा गायकवाड, वंदना चौधरी, अक्षता ठाकरे, संध्या वाघ, शैला सावळे, मृणाली कुलकर्णी, दीपाली सोनवणे, मंजू ठाकूर, प्रियंका सोनवणे, मनीषा सूर्यवंशी, नुरजहाँ शेख, सागर मांढरे व जितेंद्र जाधव यांना स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमास रोटरीचे सचिव सुमित बच्छाव, सतीश कलंत्री, प्रकल्प संयोजक प्रवीण निकम, विलास सोनजे, केशव खैरनार आदी उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.