आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

१८ सप्टेंबरला मतदान तर १९ ला हाेणार मतमाेजणी:कळवणमधील २२ ग्रामपंचायतींचा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर

कळवण3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील २२ ग्रामपंचायतींचा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून १८ सप्टेंबर रोजी सकाळी ७.३० ते ५.३० या वेळेत मतदान होणार आहे. तालुक्यातील जानेवारी २०२१ ते सप्टेंबर २०२२ या कालावधीत मुदत संपलेल्या व जून २०२२ ते सप्टेंबर २०२२ या कालावधीत मुदत संपणाऱ्या २२ ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाली आहे. दि २४ ऑगस्टपासून नामनिर्देशन पत्र दाखल करता येणार आहे. नामनिर्देशनपत्राची छाननी दि २ सप्टेंबर रोजी होणार आहे. नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची मुदत दि ६ सप्टेंबर दुपारी ३ वाजेपर्यंत आहे. याच दिवशी माघारी घेण्याची मुदत संपल्यानंतर चिन्ह वाटप केले जाणार आहे. दि १८ सप्टेंबर रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५. ३० वाजे दरम्यान मतदान होणार आहे. मतमोजणी दि १९ सप्टेंबर रोजी प्रशासकीय इमारत कोल्हापूर फाटा येथे होणार आहे.

दरम्यान, २२ ग्रामपंचायती या जिल्हा परिषदेच्या चारही गटातील आहेत. या निवडणूक जरी पक्षीय चिन्ह विरहित असल्या तरी आपल्या समर्थकांची वर्णी लागावी यासाठी सर्वच लोकप्रतिनिधी अप्रत्यक्ष प्रयत्न करतील. त्यामुळे या निवडणुकाचे निकाल आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांवर परिणाम करणारे असतील, अशी शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे या निवडणुकांची रंगत वाढणार आहे.

निवडणूक जाहीर झालेल्या ग्रामपंचायती
वडाळे वणी, आठंबे, नवीबेज, पाटविहीर, नाकोडे, गणोरे, धार्डेदिगर, दह्यानेदिगर, भेंडी, दरेभणगी, मोकभणगी, भुताणेदिगर, ककाणे, जुणीबेज, खेडगाव, विसापूर, रवळजी, पिंपळे बु. नाळीद, मळगाव खु.,गोबापूर, साकोरे आदी.

बातम्या आणखी आहेत...