आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाहनचालकांत नाराजी:हरसूल-रोहिले फाटा रस्त्यावर अनेक ठिकाणी डांबरीकरण नाही; सार्वजनिक बांधकामचे दुर्लक्ष

हरसूल2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

हरसूल-रोहिले फाटा रस्त्यावर अनेक ठिकाणी डांबरीकरण न केल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाला डांबरीकरणाचा विसर पडला का?असा सवाल नागरिक करीत आहे.

हरसूल ते रोहिले फाटा हा १८ किमी लांबीचा रस्ता पूर्ण खराब झाल्याने काही दिवसांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने तो नव्याने बनविण्यात आला. परंतु यात सरळ आंबा परिसरात डांबरीकरण केले गेले नाही. पुढे वाघेरापर्यंत चांगल्या प्रतीचे काम केल्यानंतर घाटामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी खराब रस्ता तसाच कायम ठेवल्याने संबंधितांना डांबरीकरणाचा विसर पडला की काय असा सवाल वाहनचालक व प्रवासी करत आहे.

वाघेरा घाटामध्ये नव्याने काम चालू असताना डांबरीकरण न केलेल्या जागा निदर्शनास आणून दिल्यानंतर तेथे नव्याने काम करण्यात येईल असे सांगण्यात आले. परंतु काम न झाल्याने प्रवासीवर्गाने नाराजी व्यक्त केली आहे.

बातम्या आणखी आहेत...