आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआपण ग्रंथाशी बोलले पाहिजे, आपल्या सुखदुःखात ग्रंथांना सोबत घेतले तर जीवनातील बरेच प्रश्न विनासायास सुटतील. जीवनात ग्रंथांचे अनन्यसाधारण महत्त्व असल्याचे प्रतिपादन सिन्नर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. व्ही. रसाळ यांनी केले.किसनराव काळे महाराजांनी लिहिलेला ‘विश्व आणि ईश्वर तत्त्वबोध’ या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा चांदवड तालुक्यातील धोडंबे जवळील, विजयनगर येथे झाला. या सोहळ्याचे अध्यक्ष म्हणून ते बोलत होते.
प्रमुख अतिथी म्हणून संतसेवक ह.भ.प. गोपालदासजी वैष्णव, सेवानिवृत्त प्रा. डॉ. माधव खालकर, विजयनगरचे सरपंच काकासाहेब काळे, सुरेशबाबा निखाडे, ह. भ. प. निवृत्ती महाराज काळे, एकनाथ रसाळ, शिवराम काळे, लक्ष्मीनारायण भुतडा, भीमराव धोंडगे, सुरेश शिवराम काळे, अण्णासाहेब जाधव आदी उपस्थित होते. ‘विश्व आणि ईश्वर तत्त्वबोध’ हा ग्रंथ, प्रत्येकाच्या घरी असावा, मानवी जीवनात धर्म, देव, देवपूजा, यात्रा, कर्म या गोष्टींना अतिशय महत्त्व आहे.
माणसाने आनंदी जीवन जगावे यासाठीच सारे काही असले तरी आपण दुःखी का राहतो यासारख्या अनेक प्रश्नांची चर्चा या छोटेखानी ग्रंथात केली असल्याने या सर्वसमावेशक ग्रंथाचे, वाचक आवर्जून स्वागत करतील, असा विश्वास प्राचार्य डॉ. रसाळ यांनी व्यक्त केला. सूत्रसंचालन प्रा. डॉ. नयना काळे यांनी केले. दत्तात्रय काळे यांनी आभार मानले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.