आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दाम्पत्याचे मारेकरी:मालेगावी वृद्ध दाम्पत्याचे मारेकरी अद्याप माेकाट

मालेगाव16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगलाजनगरमधील वृद्ध दाम्पत्याच्या खुनाची उकल करण्यात पाेलिसांना अद्याप यश आलेले नाही. घटनास्थळी कुठलेही ठाेस पुरावे मिळून न आल्याने मारेकरी माेकाटच आहेत. दाेघांचा शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाला आहे. त्या अनुषंगाने पाेलिसांकडून सखाेल तपास केला जात आहे.

गुरुवारी पहाटे आग लागलेल्या घरात अल्ताफ अहमद सईद अहमद व त्यांच्या पत्नी अल्कमा अल्ताफ अहमद यांचे मृतदेह आढळून आले हाेते. यात अल्कमा यांचा मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत हाेता. दाेघांच्या डाेक्यावर जखमा असल्याने कुणीतरी त्यांची हत्या करून पुरावा नष्ट करण्यासाठी घरात आग लावल्याचा संशय आहे. पाेलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

मात्र, घटनेच्या चार दिवसांनंतरही हत्येचा उलगडा झालेला नाही. दाम्पत्याच्या खुनामागील कारणांचा पाेलिस शाेध घेत आहेत. नियाेजन करून दाेघांची हत्या केल्याचे प्रथमदर्शनी समाेर येत आहे.

लवकरच उलगडा हाेईल
खुनाचे धागेदाेरे हाती लागलेले नाही. शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाला आहे. अहवालावरून तपासाला एक दिशा मिळणार आहे. गुन्ह्याचा याेग्य तपास सुरू असून खुनाचा लवकरच उलगडा हाेईल. - अनिकेत भारती, अपर पाेलिस अधीक्षक, मालेगाव

बातम्या आणखी आहेत...