आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासोयगाव मराठी शाळेजवळ दर रविवारी रस्त्यावरच भरणारा आठवडे बाजार परिसरातील स्थानिक नागरिक व मुख्य रस्त्यावरील वाहनचालकांसाठी डोकेदुखी झाला आहे. तर दुसरीकडे बाजारातील विक्रेत्यांची संख्या मात्र आठवडागणिक वाढतच आहे.त्यामुळे आठवडे बाजारचा परीघ वाढू लागला आहे. मराठी शाळा ते तुळजाभवानी मंदिर, मराठी शाळा ते दौलतनगर तसेच शाळा ते पाण्याच्या टाकीपर्यंत बाजार बसू लागल्याने तिन्ही बाजूने रस्ता बंद होत आहे. रविवारी मुख्य रस्ताच रहदारीसाठी बंद होत असल्याने बाजार स्थलांतरच्या मागणीने जोर धरला आहे. गेल्या वर्षभरापासून सोयगावातील आठवडे बाजार दुसरीकडे हलवण्याची मागणी होत आहे. मात्र मनपा प्रशासनाने या मागणीला गांभीर्याने घेतलेले नाही.
बाजारासोबतच विक्रीसाठी व खरेदीसाठी येणारे नागरिक रस्त्यावर वाहने पार्किंग करतात. त्यामुळे रस्त्यावर बसणारे विक्रेते, खरेदी करणारे नागरिक, रस्त्यावर वाहन पार्किंग या समस्या मोठ्या प्रमाणात उद्भवत आहेत. दर रविवारी संध्याकाळी चार ते आठ वाजेपर्यंत या भागातून जाणे-येणे अवघड होत आहे. दौलतनगर परिसरातील नागरिकांना सटाणानाका, मालेगाव शहरात जातांना बाहेरून फिरून जावे लागत आहे.याभागात एखादा नागरिक गंभीर आजारी पडल्यास रुग्णवाहिका अथवा रुग्ण घेऊन जाणाऱ्या खाजगी वाहनांना रस्ता नसतो. मनपाकडून दर रविवारी हजारो रुपये कर वसुली होते मात्र सुविधा पुरवली जात नाही. बाजारासाठी पर्यायी दुसरी जागा उपलब्ध असतानादेखील मनपा निर्णय घेत.
नागरिकांनी सुचवला पर्याय
सोयगाव मराठी शाळेमागील उद्यान गेल्या तीन वर्षांपासून ओस पडले आहे. उद्यानात गवत वाढले असून ही जागा उपयोगात नाही. त्यामुळे येथील साफसफाई केल्यास आठवडे बाजाराला प्रशस्त जागा उपलब्ध होऊन आठवडे बाजार जागेचा प्रश्न निकाली निघेल.
अपघातांना आमंत्रण
आठवडे बाजार मुख्य रस्त्यावर भरत असून रहदारीसाठी जागाच उरत नाही. संध्याकाळी प्रचंड गर्दी होते. रस्त्यावरच वाहने पार्किंग होतात. आठवडे बाजारामुळे तिन्ही बाजूंचा रस्ता बंद होत आहे. यामुळे अपघातांना आमंत्रण मिळते. - ऋषिकेश बच्छाव, सोयगाव
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.