आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रस्ता:राजीवनगर येथून कलानगरकडे जाणाऱ्या रिंगरोडची दयनीय अवस्था; 10 वर्षांपासून रस्ता खडतरच

इंदिरानगर14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

लेखनगर, राजीवनगर येथून कलानगरकडे जाणाऱ्या मुख्य रिंगरोडची दयनीय अवस्था झाली आहे. एका विशिष्ठ ठिकाणी संपूर्ण रस्ता खडतर झाला आहे. तेथे खड्ड्यांतील खडी आणि कच बाहेर आल्याने त्यावरुन घसरून वाहनांचे लहानमठे अपघात आता नित्याचेच झाले आहेत. गेल्या दहा ते पंधरा वर्षांपासून हा रस्ता जैसा थेच आहे. लोकप्रतिनिधी येतात आणि जातात. रस्ता मात्र तसाच रहाताो असे नागरिकांनी व्यक्त केले आहे.

जुना प्रभाग क्र. ३० मध्ये लेखानगर तसेच राजीवनगर विशेषवस्तीकडून इंदिरानगर कलानगरकडे जाणाऱ्या मुख्य रिंगरोडचे दहा ते पंधरा वर्षांपूर्वी रुंदीकरण तसेच डांबरीकरण करण्यात आले. ते अजूनही रखडलेलेच आहे. विशेषवस्तीच्या पुढेच रस्त्यावर खड्डे पडले आहेत. यासह खड्ड्यांमधील खडी रेती बाहेर येऊन पडले आहे. या खडी व छोट्या-मोठ्या खड्ड्यांमुळे या ठिकाणाहून ये - जा करणारे वाहने घसरणे नित्याचेच झाले आहे.

अनेकदा रात्री दुचाकी वाहनांचे किरकोळ अपघात होतात. त्यामुळे या रस्त्याचे काम तत्काळ करावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे. या रस्त्यालगत फुटपाथवर रहिवाशांनी अतिक्रमण केल्याने रस्ता अरुंद झाला आहे. रस्त्यालगत अवजड चारचाकी वाहने उभी केली जातात. याच रस्त्यावरुन अवजड वाहतूक मोठ्या प्रमाणात असल्यानेही रस्ता खराब झाला आहे.

टोलवाटोलवीची उत्तरे
लेखानगर येथील हॉटेल जवळील दुभाजक सुषोभिकरण करुन रस्ता चकाचक केला आहे. पण विशेष वस्तीजवळ रस्ता का दुरुस्त केला जात नाही. त्याबद्दल अधिकारी काहीही बोलत नाही. लाेकप्रतिनिधी, अधिकारी म्हणतात की, हा रस्ता आमच्या अधिपत्याखाली नाही तो रोड राज्य सरकारचा आहे प्रत्येकजण हात झटकतो.
- अॅड. शरद जाधव, परिसरातील रहिवाशी

बातम्या आणखी आहेत...