आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्र्यांचा हस्ते होणार भूमिपूजन:करंजवण योजनेसाठी पालिकेला एक रुपयाही भरावा लागणार नाही

मनमाड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मनमाड-करंजवण या ३०५ कोटी रुपये खर्चाच्या योजनेसाठी नगरपालिकेला एक रुपयाही भरावा लागणार नाही. ही योजना १८ महिन्यांत पूर्ण होईल. त्याच्या टेंडरची वर्कऑर्डर १-२ दिवसांतच ईगल कंपनीला दिली जाणार असून १५ डिसेंबरपर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन होईल, असे प्रतिपादन नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास कांदे यांनी केले.

या योजनेसाठी लोकवर्गणीपोटी भरावी लागणार पूर्ण रक्कम अमृत योजनेत असल्याने व मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यासाठी हमी घेतल्याने ही रक्कम पालिकेला भरावी लागणार नाही. १९ टक्के अबोव्ह रकमेचे टेंडर आले असले तरी याबाबत कंत्राटदाराशी चर्चा झाली असून कोणत्याही परिस्थितीत नगरपालिकेवर या योजनेचा कोणताही बोजा पडणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

याेजनेची माहिती हाेण्यासाठी ‘खेळ पैठणीचा, सन्मान स्त्रीशक्तीचा’ कार्यक्रम शहरांतील सर्वसामान्य जनतेला ही योजना माहिती व्हावी, या योजनेचे नेमके स्वरूप काय आहे? किती खर्च लागणार, किती वेळ लागणार? कशाप्रकारे घराघरांत पाणी येणार? यासाठी शहरांतील प्रत्येक प्रभागात ‘खेळ पैठणीचा, सन्मान स्त्रीशक्तीचा’ हा आगळावेगळा होम मिनिस्टर कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्यास महिलांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. सिनेअभिनेता क्रांती मळगावकर यांचा हा न्यू होम मिनिस्टर खेळ पैठणीचा गप्पागोष्टी रंजक खेळ, हिंदी, मराठी गाणी व कॉमेडी शो सादर केले आहेत.

बातम्या आणखी आहेत...