आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दाखल:वाजे यांच्यासह तिसऱ्या पॅनलच्या निर्मितीची शक्यता; स्टाईसच्या निवडणुकीसाठी दोन दिवसांत 17 जणांचे अर्ज दाखल

सिन्नर16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘स्टाईस’ तथा सिन्नर तालुका औद्योगिक सहकारी वसाहतीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून दोन दिवसांत १७ जणांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले आहे. सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा व्यवस्थापक कमलाकर पोटे यांनी ही माहिती दिली.

संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी गुरुवार (दि. ९) पासून अर्ज भरण्यास प्रारंभ झाला. शुक्रवारी (दि. १०) कारखानदार गटातून माजी संचालक नामकर्ण यशवंत आवारे, प्रभाकर बडगुजर, सिंधू नामकर्ण आवारे, माजी अध्यक्ष अरुण किसनराव चव्हाणके, भाजप उद्योग आघाडीचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल जपे, माजी संचालक संदीप नामकर्ण आवारे, सुनील दादाजी कुंदे यांनी अर्ज दाखल केले.

दोन दिवसांच्या सुटीनंतर सोमवारी (दि. १३) दुसऱ्या दिवशी कारखानदार गटातून श्रीहरी अरुण नावंदर, कैलास भीमराज हांडोरे, महेंद्र मुरलीधरसा क्षत्रिय, अविनाश एकनाथ तांबे, चंद्रभान केशव हासे, बाबासाहेब कारभारी दळवी, शिवाजी रामचंद्र आवारे, अनुसूचित जाती/जमाती गटातून मधुकर लहूजी जगताप, इतर मागास प्रवर्गातून अविनाश एकनाथ तांबे, भटक्या विमुक्त जाती/जमाती गटातून रामदास भास्कर दराडे यांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले. दरम्यान, १५ जूनपर्यंत नामनिर्देशनपत्र दाखल करता येणार असल्याने दोन दिवस त्यासाठी उरले आहेत. या निवडणुकीत विद्यमान आमदार माणिकराव कोकाटे, माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्या समर्थकांचे परस्परविरोधी पॅनल एकमेकांसमोर उभे ठाकणार आहे. याशिवाय सद्यस्थितीतील राजकीय घडामोडींवरून आणखी तिसरे पॅनल पुढे येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...