आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी:वाढीव दराचा प्रश्न मिटला,‎ बस आगारातील पंप सुरू‎

सिन्नर‎12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बस आगारातील पंपांना डिझेल प्राप्त‎ झाल्याने चालकांसह प्रवाशांचा‎ त्रास वाचला आहे. चार‎ दिवसांपासून आगारातच डिझेल‎ प्राप्त झाल्यामुळे वेळेतही बचत‎ झाली आहे.‎ सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रेय‎ गोसावी यांनी बस आगारातील‎ पंपांना इतर पेट्रोलपंपाच्या‎ दराप्रमाणेच डिझेल मिळावे व‎ आगारातील पंप सुरू करण्यात यावे,‎ अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ‎ शिंदे, पालकमंत्री दादा भुसे व‎ परिवहन महामंडळाच्या विभागीय‎ नियंत्रकांकडे केली होती. खाजगी‎ पंपावर बसचा वेळ जात असल्याने‎ प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो.‎ त्यामुळे आगारातील पंपावरच कमी‎ दरात डिझेल उपलब्ध करून‎ देण्याची मागणी केली होती.

या‎ मागणीला यश आले आहे.‎ आगारातील पंपासाठी तब्बल २३‎ रुपये लिटर जादा दराने डिझेल‎ उपलब्ध होत होते. त्यामुळे परिवहन‎ महामंडळाने खासगी पेट्रोलपंपावर‎ डिझेल भरण्याच्या सूचना आगारांना‎ केल्या होत्या.‎ सद्यस्थितीत अन्य‎ पेट्रोलपंपांप्रमाणेच आगारालाही‎ त्याच दरात डिझेल उपलब्ध करून‎ देण्यात आल्याने वेळ व पैशाची‎ बचत झाली आहे.‎

बातम्या आणखी आहेत...