आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आश्वासनाचा विसर:‘खड्डेमुक्त सिन्नर’चे आश्वासन हवेतच ; भाजपने मुख्याधिकाऱ्यांना करून दिली आठवण

सिन्नर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘खड्डेमुक्त सिन्नर'साठी गतवर्षी नवरात्रोत्सवात भाजपच्या वतीने व्यापक आंदोलन उभारले होते. यावेळी मुख्याधिकारी संजय केदार यांनी शहरातील रस्ते खड्डेमुक्त करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र वर्षभरानंतरही शहरातील खड्डे ‘जैसे थे'च असून त्यात आणखी भर पडली असल्याने मुख्याधिकाऱ्यांना आपल्या आश्वासनाचा विसर पडल्याचा आरोप शहराध्यक्ष बाळासाहेब हांडे, डॉ. दीपक श्रीमाळी यांनी केला आहे.

वर्दळीचा असलेला खासदार पूल ते आडवा फाटा ते रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. ऐश्वर्या गार्डन ते नायगाव रस्ताही अखेरच्या घटका मोजत आहे. त्या रस्त्यावरून मार्गक्रमण करणाऱ्यांना नगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे मनस्ताप सहन करावा लागतो. गतवर्षी दिलेले आश्वासन मुख्याधिकाऱ्यांनी पाळले नाही, मात्र यावर्षी त्यात लक्ष घालून दोन्ही रस्त्यांचे काँक्रिटीकरण करून द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. सध्या नगरपालिकेवर प्रशासकीय राजवट असून या रस्त्यांच्या कामासाठी कुणा राजकीय लाेकप्रतिनिधींची इच्छाशक्तीची गरज नाही. त्याऐवजी अधिकारी म्हणून आपणच पुढाकार घ्यावा, असा सल्लाही पदाधिकाऱ्यांनी मुख्याधिकाऱ्यांना दिला आहे.

बातम्या आणखी आहेत...