आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निधी मंजूर:अमरधाम रोडवरील पुलाचा‎ प्रश्न आता लागणार मार्गी‎

नांदगाव‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुलाच्या कामात अडथळा ठरणाऱ्या ‎पाइपलाइन शिफ्टिंगच्या कामास‎ निधी उपलब्ध झाल्याने नांदगाव ‎शहरातील शाकंबरी नदीवरील‎ अमरधामकडे जाणाऱ्या पुलाचा‎ प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहे.‎ गतवर्षी येथे झालेल्या‎ अतिवृष्टीमुळे शाकंबरी नदीला‎ आलेल्या पुरात मुख्य‎ स्मशानभूमीकडे जाणारा पूल वाहून‎ गेला होता. त्यावेळी वाहून गेलेल्या‎ पुलाच्या जागेवर व कृषी उत्पन्न‎ बाजार समितीच्या मागे भोले नगर‎ स्मशानभूमीलगत लेंडी नाल्यावर‎ नवीन पूल बांधण्यासाठी आमदार‎ सुहास कांदे यांनी तातडीने नगरविकास‎ खात्याकडून निधी मंजूर करून घेतला‎ होता.

त्यानुसार भोलेनगर‎ स्मशानभूमिलगत पूल बांधून पूर्ण‎ झाला, मात्र शाकंबरी नदीवर पूल‎ बांधण्याच्या नियोजित जागे खालून ५६‎ खेडी पाणी योजनेची पाईपलाईनचा‎ अडथळा येत असल्याने पुलाच्या‎ कामाला सुरुवात होऊ शकली नव्हती.‎ पाइपलाइन शिफ्टिंगचा खर्च मोठा‎ असल्याने ठेकेदारानेही कामाला‎ सुरुवात करण्यास नकार दर्शविला‎ होता. जिल्हा परिषदेकडे निधी‎ मिळण्यात अडचणी येत असल्याने‎ आमदार सुहास कांदे यांनी या‎ कामासाठी आमदार निधीतून २५ लाख‎ रुपये संबंधित विभागाकडे वर्ग केले‎ आहेत.‎ पाइपलाइन शिफ्टिंगचा कामाला‎ निधी उपलब्ध झाल्याने पुढील‎ आठवड्यात कामाला सुरुवात होणार‎ आहे. शिफ्टिंगचे काम पूर्ण झाल्यानंतर‎ लगेचच प्रत्यक्ष पुलाच्या कामाला‎ सुरुवात होणार आहे.‎‎

आंदाेलनाची दखल‎
पूल वाहून गेल्याने शाकंबरी नदीवर‎ तात्पुरत्या स्वरूपात कच्चा पूल‎ बांधण्यात आला होता.‎ पावसाळ्यात नदीला पाणी‎ असल्याने नदीपलीकडच्या‎ वस्त्यांवरील नागरिक तसेच‎ अंत्ययात्रेला पाण्यातून जावे लागत‎ होते. याकडे शहरातील नागरिकांनी‎ प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी‎ प्रतिकात्मक तिरडी आंदोलन छेडले‎ होते.‎

बातम्या आणखी आहेत...