आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निकाल:लासलगाव महाविद्यालयाचा निकाल 99.68 टक्के

लासलगाव16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

टक्केलासलगाव महाविद्यालयातून कला, वाणिज्य, विज्ञान व व्यावसायिक अभ्यासक्रम विभागातून एकूण ६४५ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यापैकी एकूण ६४३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. महाविद्यालयाचा निकाल ९९.६८ टक्के इतका लागला आहे.

अकौंटन्सी आणि गणित या विषयात अनुक्रमे सुजल सुनील दायमा आणि ओम ज्ञानेश्वर गायकवाड या विद्यार्थ्यांना १०० पैकी १०० गुण मिळाले.विज्ञान शाखेच्या निकालाची टक्केवारी १०० टक्के आहे. त्यातील प्रथम क्रमांक जाधव अभिषेक राजाराम, ९२.५० टक्के, द्वितीय क्रमांक गंभीरे साक्षी संदीप ९२.०० टक्के, तृतीय क्रमांक भालेराव ऋतुजा विजय ९०.५० टक्के, चतुर्थ क्रमांक गायकवाड ओम ज्ञानेश्वर ९०.१७ टक्के, पाचवा क्रमांक शिंदे अभिजित मनोहर ८९.८३ टक्के मिळाले आहेत

वाणिज्य शाखेच्या निकालाची टक्केवारी १०० टक्के आहे. त्यात प्रथम क्रमांक बकरे समृद्धी योगेश ९३.६७ टक्के, द्वितीय क्रमांक दायमा सुजल सुनील ९०.०० टक्के, तृतीय क्रमांक होळकर क्षितिजा विजय ८९.५० टक्के,चतुर्थ क्रमांक माठा महेक संतोष ८९.३३ टक्के, पाचवा क्रमांक कोळी चिराग महेंद्र ८६.३३ टक्के मिळाले आहेत. कला शाखेचा निकाल ९९.५९ टक्के आहे. त्यात प्रथम कबाडी ईशाखंडू ८३.६७ टक्के, द्वितीय क्रमांक रायते जय भास्कर ८२.१७ टक्के, तृतीय क्रमांक आरगडे रुपाली आण्णा ७९.२३ टक्के, चतुर्थ क्रमांक रायतेपूजा सोपान ७८.५० टक्के, चतुर्थ क्रमांक ठाकरे सुदर्शन रामेश्वर ७८.५० टक्के, पाचवा क्रमांक पिंपळे दिनेश नाना ७८.०० टक्के मिळाले आहेत.

व्यावसायिक अभ्यासक्रम निकालाची टक्केवारी ९७.९५ टक्के आहे. त्यात प्रथम क्रमांक पगार शैलेश बाबासाहेब ७६.३३ टक्के, द्वितीय क्रमांक गरुड सुजाता प्रवीण ७५.१७ टक्के, तृतीय क्रमांक म्हसकर हरि ओम बाजीराव ७४.५० टक्के, तृतीय क्रमांक मालसाने पूजा भीमराज ७४.५० टक्के,चतुर्थ क्रमांक सोमवंशी कृष्णा त्र्यंबक ७३.८३ टक्के,चतुर्थ क्रमांक गुंजाळ पूजा शांताराम ७३.८३ टक्के,तर पाचवा क्रमांक पवार राहुल रतन ७३.५० टक्के मिळवून उत्तीर्ण झाले आहेत.

बातम्या आणखी आहेत...