आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यातील १३ ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुकीत नशीब आजमावणाऱ्या २५९ उमेदवारांच्या भाग्याचा मंगळवारी (दि. २०) फैसला हाेणार आहे. सकाळी १० वाजता तहसील कार्यालयाच्या वरच्या मजल्यावर मतमाेजणीला प्रारंभ हाेईल. तीन फेऱ्यांमध्ये निकालाचे नियाेजन करण्यात आले आहे. मतमाेजणीसाठी पाच टेबलांची व्यवस्था केली असून ४० कर्मचारी नियुक्त केले आहेत.
माल्हनगाव, शिरसाेंडी, वजीरखेडे, दाभाडी, टाेकडे, राेंझे, जाटपाडे, साैंदाणे, निंबायती, पाटणे, करंजगव्हाण, माेहपाडे व चाैकटपाडे या ग्रामपंचायतींसाठी मतदान झाले. सरपंचपदासाठी ३३ तर सदस्य पदाचे २२६ उमेदवार रिंगणात हाेते. दाभाडी, साैंदाणे, करंजगव्हाण येथे चुरशीच्या लढती झाल्या. दाभाडीला ६६.९१ टक्के मतदान झाले हाेते. साैंदाणेच्या सदस्यपदाच्या १५ जागा अविराेध झाल्याने थेट सरपंचपदाच्या जागेसाठी लक्षवेधी लढत झाली आहे.
मतदान प्रक्रिया संपल्यानंतर रात्री ईव्हीएम मशीन तहसील कार्यालयाच्या स्ट्राँगरूममध्ये सुरक्षित ठेवण्यात आले. मंगळवारी सकाळी मतमाेजणीपूर्वी उमेदवार व प्रतिनिधींसमाेर स्ट्राँगरूम उघडले जाईल. यानंतर प्रत्यक्ष मतमाेजणीला प्रारंभ केला जाणार आहे. पहिल्या फेरीत पाच ग्रामपंचायतींची मतमाेजणी हाेईल. दुसऱ्या फेरीत ५ व तिसऱ्या अंतिम फेरीत तीन ग्रामपंचायतींचा निकाल घाेषित हाेणार आहे. साधारण दीड तासात सर्व निकाल जाहीर हाेण्याची शक्यता आहे.
४० जागा अविराेध माघारीनंतर ४० जागा अविराेध झाल्या आहेत. राेंझे येथे थेट सरपंचपदी सुमन गायकवाड यांची अविराेध निवड झाली आहे. साैंदाणेच्या सदस्यपदाच्या सर्वाधिक १५ जागा अविराेध झाल्या हाेत्या. करंजगव्हाणच्या ७ तर शिरसाेंडीच्या ६ जागाही अविराेध झाल्या आहेत. माल्हनगावच्या ७ व राेंझेच्या ४ जागांसाठी एकमेव अर्ज आल्याने या जागाही अविराेध झाल्या हाेत्या.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.