आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी:खामखेडा चौफुली ते सावकी पाडा‎ रस्त्याला काटेरी झुडुपांचा विळखा‎

देवळा‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील खामखेडा चौफुली ते ‎सावकीपाडा दरम्यान दीड ते दोन‎ किलोमीटर अंतराचा रस्ता‎ जागोजागी काटेरी झुडुपांच्या‎ विळख्यात हरवला अाहे. रस्त्याच्या‎ दुतर्फा वाढलेल्या काटेरी झुडपांमुळे‎ दुचाकी वाहने चालविणे मुश्किल‎ झाले आहे.‎ राज्य मार्ग क्रमांक ७ वरील‎ खामखेडा चौफुलीच्या पुढे‎ रस्त्याच्या दुतर्फा काटेरी झुडपे‎ आल्याने वाहनधारकांना रस्ता‎ दिसत नसल्याने अपघातात वाढ‎ झाली असून संबधीत प्रशासनाने‎ तात्काळ या रस्त्यावरील काटेरी‎ झुडपे काढून रस्त्याचा श्वास‎ मोकळा करण्याची मागणी‎ खामखेडा येथील लोकनियुक्त‎ सरपंच वैभव पवार यांनी केली‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ आहे.

वर्दळ असलेल्या या मार्गावर‎ ठिकठिकाणी काटेरी झुडुपे,‎ बाभळीची झाडे रस्त्यावर आल्याने‎ अपघाताच्या घटनांत मोठी वाढ‎ झाली आहे.‎ खामखेडा-सावकी मार्गावरून‎ शेकडो वाहने ये-जा करतात. हा‎ रस्ता तालुक्याला जोडणारा‎ असल्याने नेहमीच वाहनांची वर्दळ‎ असते परंतु रस्ता अरूंद, काटेरी‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ झुडपांनी वेढला असल्यामुळे वळण‎ मार्गावर अपघात होत आहेत. या‎ काटेरी झुडुपांमुळे समोरून येणारे‎ वाहनच नजरेस पडत नाही. दोन‎ वाहन एकाच वेळी आल्यास‎ झुडपाची काटे प्रवाशांना टाेेचतात‎ दिवसेंदिवस या झाडांचा त्रास वाढत‎ असून तात्काळ संबंधित विभागाने‎ काटेरी झुडपे काढावेत, अशी‎ मागणी नागरिक करत आहेत.‎

बातम्या आणखी आहेत...