आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:वर्गणी काढून श्रमदानातून कोळुष्टी ग्रामस्थांनी बनवला रस्ता, भरउन्हात केली दुरुस्ती; शासन, लोकप्रतिनिधींकडे दुरुस्तीची मागणी करूनही दुर्लक्ष केल्याने घेतला निर्णय

हरसूल5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पेठ तालुक्यातील देवीचामाळ ग्रामपंचायतीमधील पायरपाडा ते कोळुष्टीदरम्यान तीस वर्षांपूर्वी दोन किलोमीटरचा रस्ता तयार केला. मात्र, काही वर्षांपासून या रस्त्याची दुरवस्था झाल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यामुळे कोळुष्टी ग्रामस्थांनी वर्गणी काढत ७० ग्रामस्थांसह विद्यार्थ्यांनी उन्हाचा चटका सहन करत तीन दिवस श्रमदानातून या दोन किलोमीटर रस्त्याची दुरुस्ती केली.

या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी नागरिकांनी ग्रामपंचायतीसह राज्य शासन, केंद्र सरकार व लोकप्रतिधींना साकडे घातले. त्यामुळे २०१३ मध्ये पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून कोळुष्टी ते पायरपाडादरम्यान एक किलोमीटर रस्त्याची दुरुस्ती केली. मात्र, पुढील रस्ता तसाच सोडून दिला. ज्या भागाची दुरुस्ती करण्यात आली ती ही निकृष्ट केल्याने काही महिन्यांतच या रस्त्याचीही दुरवस्था झाली. त्यामुळे या रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी केली होती.

मात्र, त्याकडे संबंधित यंत्रणेने दुर्लक्ष केल्याने ग्रामस्थांनी स्वत:च रस्ता दुरुस्तीचा निर्णय घेतला. रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात आले. श्रमदानातून पायरपाडा ते कोळुष्टी गावातील हनुमान मंदिराच्या प्रगणापर्यंत सुमारे दोन किलोमीटरचा रस्ता दुरुस्त करण्यात आला. यासाठी गावातील ज्येष्ठ ग्रामस्थ व ग्रामपंचायत सदस्य नामदेव गावित, विष्णू बोरसे यांच्यासह कैलास गावित आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...