आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:कुठे तरुणांच्या तर कुठे ज्येष्ठांच्या हाती सरपंचपदाची धुरा ; नांदूरशिंगोटेत सत्ताधारी कायम

सिन्नर / भरत घोटेकर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील १२ ग्रामपंचायतींच्या चुरशीच्या लढतीत कुठे तरुणांच्या तर कुठे ज्येष्ठांच्या हाती जनतेने सरपंचपदाची धुरा सोपवली. थेट सरपंच निवडणुकीत नांदूरशिंगोटे, शहा, आशापूर ग्रामस्थांनी अटीतटीची व चुरशीची निवडणूक अनुभवली. ठाणगाव, सायाळे, कारवाडी, नांदूरशिंगोटे, कृष्णनगर येथे वाजे गटाने बाजी मारली. शहा, उजनी, पाटपिंप्री, कीर्तांगळी येथे आमदार माणिकराव कोकाटे समर्थकांनी सत्ता मिळवली आहे. वडगाव पिंगळा, आशापूर, शास्त्रीनगर येथील निवडून आलेल्या सरपंच आणि सदस्यात कोकाटे-वाजे गटाचे कार्यकर्ते एकत्र असल्याने नवनिर्वाचित सरपंचांनी स्थानिक आघाडीने सत्ता मिळविल्याचे सांगितले.

आशापूर ग्रामपंचायतीत थेट सरपंचपदाच्या चुरशीच्या निवडणुकीत सुलोचना सीताराम पाटोळे यांनी द्रौपदा दशरथ पाटोळे यांचा अवघ्या १२ मतांनी पराभव केला. नांदूरशिंगोटेत चुरशीच्या सरपंचपदाच्या निवडणुकीत पंचायत समितीच्या माजी सभापती शोभा दीपक बर्के यांनी लंकावती विलास सानप यांना अवघ्या ५३ मतांनी पराभूत केले. शहा ग्रामपंचायत निवडणुकीत संभाजी जाधव यांनी बाजी मारली. वाजे गटाने सात ग्रामपंचायतींत आपले वर्चस्व आल्याचे तर कोकाटे गटाने आपल्या गटाची सहा ग्रामपंचायतींवर सत्ता आल्याचे दावे, प्रतिदावे केले आहेत. सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती नामदेव शिंदे तालुक्यात सर्वाधिक ६६८ मतांनी विजयी झाले आहेत. शिंदे यांना तिसऱ्यांदा सरपंच होण्याची संधी जनतेने दिली आहे.

सायाळेत धक्कादायक सत्ता परिवर्तन पूर्व भागातील सायाळे ग्रामपंचायतीत आमदार माणिकराव कोकाटे यांचे वर्चस्व होते. मात्र, यावेळी माजी आमदार वाजे गटाचे युवा कार्यकर्ते विकास शेंडगे थेट सरपंचपदाच्या निवडणुकीत २४४ मतांनी विजयी झाले. शिवाय वाजे गटाने ९ पैकी ८ सदस्यपदांच्या जागा जिंकत धक्कादायक सत्ता परिवर्तन केले.

बातम्या आणखी आहेत...