आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहर व परिसरात सोमवारी सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास तुफान वादळी पाऊस झाला. तब्बल तासभर पाऊस कोसळत होता. या मोसमातील हा पहिलाच जोरदार पाऊस होता.
मालेगावी सोमवारी दिवसभर आकाश निरभ्र होते. दुपारी उन्हाचा चटका होता. सायंकाळी सात वाजेच्या सुमारास आकाश ढगांनी भरून आले व त्यानंतर साडेसात वाजेच्या सुमारास वादळी पावसाला सुरुवात झाली. तब्बल तासभर पाऊस कोसळला. रस्त्यांवरून वादळात वाहने चालवणे मुश्कील झाल्याने चालकांनी वाहने रस्त्यालगत उभी करून जवळचे बंगले, दुकाने व शेड्सचा आसरा घेतला. याचवेळी नागरी वसाहतीत वीज गायब झाली. शहरात पश्चिमेला अनेक ठिकाणी रस्ता व गटारकामे अर्धवट आहेत, त्यामुळे या भागातून रस्ता काढताना नागरिकांना प्रचंड मनस्ताप झाला.
दरम्यान, सोमवारी सायंकाळी बागलाण व देवळा तालुक्यातील काही गावांमध्येही वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.