आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इशारा:अवजड वाहनांमुळे सोनांबे ते कोनांबे रस्ता गेला खड्ड्यात

सिन्नर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोनांबे ते कोनांबे मार्ग अवघा तीन किलोमीटर अंतराचा आहे, मात्र मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने तो वाहनधारकांसाठी जीवघेणा बनला आहे. दिवसभरात तीन ते चार दुचाकीस्वारांना अपघात होण्याच्या घटना घडत आहेत. समृद्धी महामार्गाच्या कामासाठी वाहण्यात येणाऱ्या गौण खनिजाच्या अवजड वाहनांमुळे रस्ता पूर्ण निकामी झाला आहे. तो तातडीने दुरुस्त न केल्यास पूर्वसूचना न देता कोणत्याही क्षणी खड्ड्यांत भात लावणी आंदोलन करण्याचा इशारा शिवसेनेचे संतोष डावरे यांनी दिला आहे.

हा मार्ग कोनांबे, धोंडबार, औंढेवाडी, सोनांबे, सोनारी, जयप्रकाशनगर, वडगाव-सिन्नर, हरसुले, लोणारवाडी, सिन्नर या गावांना जोडतो. परिवहन महामंडळाला ग्रामीण भागातून दुसऱ्या क्रमांकाचे उत्पादन या मार्गावर मिळते. मात्र, समृद्धी महामार्गाच्या अवजड वाहनांमुळे रस्ता वाहतुकीयोग्य राहिला नाही. सोनांबेचे सरपंच डॉ. रवींद्र पवार, अनिल पवार, विकास सोसायटीचे अध्यक्ष तानाजी पवार, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर बोडके, गोवर्धन पतसंस्थेचे अध्यक्ष रामनाथ डावरे यांनीही रस्ता दुरुस्तीची अनेकदा मागणी केली आहे. संतोष डावरे यांनी संबंधित विभाग अधिकाऱ्यांसह समृद्धी महामार्ग ठेकेदार कंपनीलाही अनेकदा कळविले आहे. रस्त्यावर घडणाऱ्या अपघातांची जबाबदारी स्वीकारण्याबरोबरच वाहन दुरुस्ती व अपघातात जखमी होणाऱ्या वाहनचालकांचा वैद्यकीय खर्चही संबंधित ठेकेदार कंपनीने करावा, अशी मागणी डावरे यांनी केली आहे. रस्ता दुरुस्तीचे काम तातडीने हाती न घेतल्यास कोनांबे ग्रामस्थांसह या मार्गावर भात लावणीचे आंदोलन हाती घेण्यात येईल, असा इशारा डावरे यांनी दिला आहे.

बातम्या आणखी आहेत...