आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:हैदराबाद, सुरतला घुमणार नाशिक ढाेलचा आवाज; नाशिक शहरातील पाच पथकांना वादनासाठी परराज्यातून निमंत्रण

सचिन जैन | नाशिक3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

लाडक्या गणरायाचे जल्लोषात स्वागत करण्यासाठी हैदराबाद, सुरत, भरूच, उज्जैन या राज्याबाहेरील शहरात नाशिकमधील ५ ढाेल पथक जाणार आहेत. या पथकामध्ये अवघ्या चार वर्षाच्या चिमुकल्या पासून ते ७० वर्षाच्या आजीचाही समावेश आहे. पारंपारिक वाद्यांचा समावेश असलेल्या या ढोल पथकांच्या वादनामुळे गणेशोत्सवाला एक वेगळेच वलय प्राप्त झाले आहे.

गणेशाेत्सवासाठी शहरात ३० पेक्षा अधिक ढोल पथक सज्ज असून गणपती आगमन सोहळा व विसर्जन मिरवणुकीत ढोल पथक वादन करणार आहे.ध्वनी प्रदूषण राेखण्यासाठी व शासन निर्बंधामुळे काही वर्षांपासून गणेश मंडळाकडून उत्सवात ढोल वादनालाच प्राधान्य दिले जाते. एका लईत तालबद्ध वादन हे ढाेल वादनाचे प्रमुख आकर्षण आहे. त्यामुळे ढाेल वादनाला मागणी वाढत आहे. दोन वर्षे काेराेना निर्बंधामुळे या वादनाला ब्रेक होता. यंदा निर्बंध हटल्याने ढोल पथक पुन्हा सज्ज झाले आहे.

डॉक्टर, आर्किटेक्ट यांची संख्या लक्षणीय
ढोल पथकांमध्ये महाविद्यालयीन तरुणांसह अभियंता, डॉक्टर, आर्किटेक्ट यांचाही समावेश आहे. दैनंदिन जबाबदारी सांभाळत रोज पथकातील वादक नियमित सराव करत असतात. नाशिक ढाेलच्या या तालाची माेहिनी शहरातील ढाेल पथकांकडून आठ बीट, ३० बीट, नाशिक ढाेल, रामलखन, गाेविंदा, कृष्णा, गरबा, ट्रेन, डाेलीबाजा, शिवस्तुती, संबळ, भीमरुपी, या वादनाच्या तालांनी वाद्यप्रेमींना माेहिनी घातली आहे.

राज्याबाहेर वादन
यंदा विसर्जन मिरवणुकीत हैदराबाद, सुरतलाही वादन हाेईल.
अमी छेडा, सहस्त्रनाद ढाेल पथक

२ महिन्यांचा सराव
पथकात २५० वादक आहेत. दाेन महिन्यांपासून वादन सराव सुरू आहे.
आशिष साेनवणे, रामनगरी पथक

बातम्या आणखी आहेत...