आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निषेध:वक्तव्याने इस्लाम धर्मीयांमध्ये नाराजी; नूपुर शर्मा यांच्या वक्तव्याचा मुस्लिम बांधवांतर्फे निषेध

मनमाड16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भाजपच्या निलंबित राष्ट्रीय प्रवक्त्या नूपुर शर्मा यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा मनमाड शहरातील मुस्लिम समाजाच्या वतीने निषेध नोंदवण्यात आला. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, या मागणीचे निवेदन प्रभारी पोलिस अधिकारी प्रल्हाद गिते यांना देण्यात आले नुपूर शर्मा आणि नवीन कुमार जिंदाल यांनी प्रक्षोभक वक्तव्य केल्याने दोन समाजात तेढ निर्माण केली आहे.

एका वृत्तवाहिनीच्या संवाद कार्यक्रमात नूपुर शर्मा यांनी वादग्रस्त वक्तव्य केले, या वक्तव्याने इस्लाम धर्मीयांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. शर्मा यांच्या विरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. जामा मशीद, नगीना मशीद आयशा मशिद, नूरानी मशीद, तांबोळी मशिद, मोहम्मदिया मज्जिद, कुरेशी गौसिया मशिद आदींच्या मौलानांसह मुस्लिम समाज बांधवांनी हे निवेदन शासनाला दिले आहे. यावेळी विविध मशिदीच्या मौलानांनी वरील घटनेचा निषेध केला. यावेळी जिल्हाध्यक्ष सादिक पठाण, संपर्कप्रमुख अल्ताफ शाह, बाबा पठाण, मोहसीन शेख आदींनी हे निवेदन पोलिस प्रशासनाला दिले

बातम्या आणखी आहेत...