आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बैठक:छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे‎ कळवणला 10 मार्च राेजी अनावरण‎

कळवण‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती‎ शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा‎ अनावरण सोहळा दि. १० मार्च रोजी‎ छत्रपतींचे वंशज संभाजी राजे‎ यांच्या हस्ते हाेत आहे.‎ अध्यक्षस्थानी माजी केंद्रीय कृषिमंत्री‎ शरद पवार व प्रमुख पाहुणे म्हणून‎ प्रख्यात शिल्पकार पद्मभूषण राम‎ सुतार हे उपस्थित राहणार‎ असल्याची माहिती शिवस्मारक‎ समितीचे अध्यक्ष भूषण पगार व‎ समितीच्या वतीने देण्यात आली.‎ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या‎ अश्वारूढ पुतळा अनावरण‎ कार्यक्रमाच्या तयारीसाठी येथील‎ विठ्ठल मंदिरात ग्रामस्थ व‎ शिवप्रेमींच्या उपस्थितीत बैठक‎ झाली.

बैठकीच्या अध्यक्षस्थानी‎ बाबुलाल पगार होते. व्यासपीठावर‎ नगराध्यक्ष कौतिक पगार उपस्थित‎ हाेते. चार वर्षांपासून शिवस्मारक‎ समितीच्या वतीने सुरू असलेल्या‎ संपूर्ण कामकाजाची माहिती परेश‎ कोठावदे यांनी दिली. तर समितीचे‎ सदस्य अविनाश पगार यांनी छत्रपती‎ पुतळा व शिवस्मारकाबद्दल माहिती‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ दिली. समितीचे अध्यक्ष भूषण पगार‎ यांनी उद्घाटन कार्यक्रमाची रूपरेषा‎ सांगून मोठ्या संख्येने उपस्थित‎ राहण्याचे आवाहन केले.

विलास‎ शिरोरे यांनी तालुक्यातील सर्व‎ शाळांमध्ये शिवरायांच्या‎ कारकीर्दीवर वक्तृत्व स्पर्धा घेण्याची‎ सूचना मांडली व विजेत्यांना रोटरी‎ क्लबच्या वतीने बक्षीस देण्याचे‎ जाहीर केले. यावेळी सुधाकर पगार,‎ नंदकुमार खैरनार, कारभारी पगार,‎ नीलेश भामरे, अतुल पगार, जयवंत‎ देवघरे यांनी मनोगत व्यक्त केले.‎ सूत्रसंचालन राकेश हिरे यांनी केले.‎ तर रवींद्र पगार यांनी आभार मानले.‎

असा आहे कार्यक्रम
दि. ४ मार्च - सायं ७ वा. विठ्ठल‎ मंदिरात पानसुपारी‎ दि. ५ मार्च - सकाळी ८ वा.‎ शिवस्मारकावर मांडव.‎ दि. ५ ते ८ मार्च - रात्री ८ ते १०‎ शिवकथा‎ दि. ६ ते ८ मार्च - सकाळी ७ ते १०‎ शिवयाग यज्ञ.‎ दि. १० मार्च - सायं ४ वा. अनावरण‎ कार्यक्रम.‎

बातम्या आणखी आहेत...