आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिलासा:विठेवाडी रस्त्यावर अपघातास कारणीभूत काटेरी झुडपे हटवली; सामाजिक कार्यकर्त्यांनी स्वखर्चाने केला रस्त्याचा श्वास मोकळा

देवळा4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील विठेवाडी - देवळा या मार्गावरील रस्त्यावर ठिकठिकाणी अपघातास कारणीभूत ठरणारे काटेरी झुडपाच्या फांद्यांचे अतिक्रमण विठेवाडी येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी स्वखर्चाने जेसीबीच्या साहाय्याने काढल्याने पादचारी व वाहनचालकांनी समाधान व्यक्त केले आहे.

विठेवाडी- देवळा या जिल्हा परीषदेअंतर्गत येणाऱ्या रस्त्यावर विठेवाडी आणि झिरेपिंपळदरम्यान ठिकठिकाणी काटेरी झुडुपांच्या विळख्यात रस्ता हरवला होता. त्यामुळे या रस्त्यावर अपघाताच्या घटनांत वाढ झाली होती. वाढत्या काटेरी झुडुपांमुळे दुचाकी, चारचाकी चालक व पादचाऱ्यांना त्रास सहन करावा लागत होता. या मार्गावरून शेकडो वाहने ये-जा करतात.

हा रस्ता तालुक्याला जोडणारा असल्याने नेहमीच वाहनांची वर्दळ असते, परंतु रस्ता अतिशय अरुंद, काटेरी झुडपांनी वेढल्यामुळे वळण मार्गावर छोटे-मोठे अपघात होत होते. या काटेरी झुडपांमुळे समोरून येणारे वाहनच नजरेस पडत नव्हते. दोन वाहन एकाच वेळी आल्यास झुडपाची काटे प्रवाशांना रुततात. दिवसेंदिवस या झाडांचा त्रास वाढत असून तत्काळ संबंधित विभागाने काटेरी झुडपे काढावेत, अशी मागणी नागरिकांनी केली होती मात्र याकडे त्यांनी दुर्लक्ष केले.

ही बाब गावातील तरुण आणि सामाजिक कार्यकर्ते प्रवीण निकम, स्वप्निल निकम, अभिजित निकम, राहुल निकम, ईश्वर निकम, अरुण निकम,तेजस निकम, ललित निकम आदींनी एकत्र येऊन स्वखर्चाने जेसीबीच्या सहाय्याने वाहतुकीस अडथळा आणि अपघातास कारणीभूत ठरणारी काटेरी झुडपे हटवली. त्यामुळे रस्त्याने मोकळा श्वास घेतला असून या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांनी समाधान व्यक्त केले आहे.

बातम्या आणखी आहेत...