आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रामीण भागातील खेळाडूंपुढे आदर्श:बागलाणच्या भूमिपुत्राला ‘आयर्न मॅन’चा किताब

सटाणा4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कजाकिस्तान येथील नुर सुलतान या शहरात नुकत्याच पार पडलेल्या आयर्न मॅन स्पर्धेत नाशिक जिल्ह्यातील सुमारे १९ स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. या स्पर्धकांमध्ये वनोली (ता. बागलाण) येथील मूळ रहिवासी निसर्ग भामरे याने निर्धारित कालावधीच्या आत तीनही स्पर्धा जिंकल्यामुळे ग्रामीण भागातील खेळाडूंपुढे आदर्श निर्माण केला आहे. यात ३.८ किमी स्विमिंग, १८० किमी सायकलिंग व ४२ किमी रनिंग असे या स्पर्धेचे स्वरूप होते.

त्याला लहानपणापासून सायकल चालविण्याची खूप आवड होती. नाशिक येथील वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेतला व विविध स्पर्धा त्याने जिंकल्या आहेत. उत्तराखंड व कर्नाटक येथे झालेल्या सायकलिंग स्पर्धेत राष्ट्रीय खेळाडू म्हणून महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले आहे.

बातम्या आणखी आहेत...