आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरातील विंचूर चौफुली ते इंद्रनील कॉर्नर पर्यंत भाजीपाला व फळ विक्रेत्यांनी केलेले अतिक्रमण पालिका व शहर पोलिस ठाण्याच्या संयुक्त कारवाईने हटवण्यात आले. विंचूर चौफुलीवरील अनधिकृत फळ विक्रेते व इंद्रनील हॉटेल कॉर्नर येथील भाजीपाला विक्रेते यांनी महामार्गालगत मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण केले होते. वेळोवेळी पालिका कार्यालयात या विक्रेत्यांची बैठक घेऊन पालिकेने तयार केलेल्या भाजीपाला व फळ विक्रेत्यांसाठी केलेल्या ओट्यावर बसावे, अशा सूचना दिल्या होत्या.
परंतु हे विक्रेते दुर्लक्ष करत विंचूर चौफुलीपासून इंद्रनील कॉर्नर पर्यंत विक्रीसाठी बसत होते. यामुळे धडक मोहीम राबवत पालिका व पोलिस प्रशासनाने रहदारीला अडचण निर्माण करणाऱ्या अनधिकृत टपऱ्या व इतर साहित्य जप्त करून अतिक्रमण हटविले. नागरिकांसाठी दैनंदिन बाजाराची व्यवस्था ओट्यांचे बांधकाम पालिकेने करून दिले आहे.
तथापि नगर परिषदेने वेळोवेळी सूचना देऊन देखील सदर विक्रेते त्या ठिकाणी बसून व्यवसाय करत नव्हते. त्यामुळे विंचूर चौफुलीवर विक्रेत्यांची जास्त गर्दी झाल्यामुळे रहदारीस अडथळा निर्माण होत होता. पालिका प्रशासक नागेंद्र मुतकेकर यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण मोहीम राबवण्यात आली. याप्रसंगी पोलिस उपनिरीक्षक सूरज मेढे, कर विभाग प्रमुख आदित्य मुरकुटे, नगररचना विभाग प्रमुख भावे, स्वच्छता निरीक्षक सागर झावरे आदी उपस्थित होते.
यापुढे मोहीम सुरुच राहणार
सर्व भाजीपाला व फळ विक्रेत्यांना नवीन बाजारतळात बसूनच व्यवसाय करावा अन्य ठिकाणी बसून रहदारीस अडथळा आणू नये असे आवाहन पालिकेने केले आहे. यापुढे देखील अतिक्रमण हटाव मोहीम सुरू राहणार असल्याचा इशारा दिला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.