आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुरक्षा भिंत:सातपूर एमआयडीसीतील बंद कंपनीची भिंत कोसळली

सातपूर6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सातपूर एमआयडीसीतील गणेशनगर येथील बंद असलेल्या कंपनीची सुरक्षा भिंत रविवारी (दि. २४) कोसळली. सुदैवाने यात कोणतीही अनुचित घटना घडली नसली तरी रहदारीला मोठा अडथळा निर्माण झाला होता. सातपूर भागात शनिवारी रात्री पावसाचा जोर वाढला होता. रविवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास गणेशनगर, सद्गुरूनगर, सोमेश्वरनगरला जोडणाऱ्या रस्त्यावर सातपूर एमआयडीसीतील बंद कंपनीची सुरक्षा भिंत पडली. या रस्त्यावर रहदारी नसल्याने जीवितहानी टळली. या परिसरात अनेक छोट्या-मोठ्या कंपन्या बंद असून त्यांच्या सुरक्षा भिंती आठ ते दहा फूट उंच आहे. देखभाल दुरुस्तीअभावी या भिंतीला अनेक ठिकाणी तडे गेलेले आहेत. दरम्यान, भिंत पडल्याने रहदारीला निर्माण झालेला अडथळा दूर करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते अ‍ॅड. महेंद्र शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले. धोकादायक भिंतीबाबत योग्य त्या उपाययोजना करण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे आमदार सीमा हिरे यांनी सांगितले.

भिंती दुरुस्ती कराव्यात
अनेक वर्षांपासून बंद कंपन्याच्या ८ ते१० दहा फूट उंच धोकादायक सुरक्षा भिंतीने मोठा अपघात होऊ शकतो. कंपनी मालकांनी योग्य उपाययोजना करावी.
अ‍ॅड. महेंद्र शिंदे, सामाजिक कार्यकर्ते

बातम्या आणखी आहेत...