आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अटक:दानपेटीतील रकमेची चोरी, संशयितांना अटक

येवलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पिंपळखुटे तिसरे येथील म्हसोबा मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करणाऱ्या तिघा संशयितांना तालुका पोलिसांनी अटक केली असून न्यायालयाने तिघांनाही ५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. चार दिवसांची पोलिस कोठडी संपल्यानंतर तिघा संशयितांना आज न्यायालयासमोर पुन्हा हजर करण्यात आले होते. पिंपळखुटे तिसरे येथील जागृत देवस्थान म्हसोबा महाराज मंदिरामध्ये २ ते ३ ऑगस्टच्या रात्री मंदिरातील दानपेटी फोडून त्यातील भाविकांनी दान केलेल्या ऐवजाची चोरी झाली होती.

यावेळी अज्ञात चोरट्यांनी मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा डीव्हीआरदेखील काढून नेला होता. याप्रकरणी तालुका पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला होता. जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील, अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत खांडवी, पोलिस उपअधीक्षक समीरसिंह साळवे यांनी सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या. तपास पथकाचे पोलिस कर्मचारी सतीश मोरे यांना सदर गुन्ह्यामध्ये एका बालकाचा सहभाग असल्याचे समजले. त्याप्रमाणे त्यांनी या संशयिताला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने हा गुन्हा संशयित ज्ञानेश्वर त्र्यंबक मोरे (२८), नामदेव नथू गायकवाड (३८), सोनू नानासाहेब गांगुर्डे (२३, सर्व रा. मळुबाईचा घाट, नगरसूल, ता. येवला) यांनी केल्याची माहिती दिली. त्या अनुषंगाने पोलिस निरीक्षक अनिल भवारी यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलिस निरीक्षक एकनाथ भिसे, उज्ज्वलसिंग राजपूत, पोलिस कर्मचारी सतीश मोरे, दिनकर पारधी, गौतम मोरे गंगासागर बनकर आदींच्या पथकाने तीनही संशयितांना नगरसूल परिसरातून ताब्यात घेतले. त्यांनी गुन्हा केल्याची पोलिसांना कबुली दिली आहे.

बातम्या आणखी आहेत...