आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पूरग्रस्तांच्या मदत:पूरग्रस्तांच्या मदतीत कसूर राहता कामा नये : आ. काेकाटे

सिन्नरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील पूरग्रस्तांंबरोबरच ग्रामीण भागातही माेठे नुकसान झाले आहे. या सर्व ठिकाणी तातडीने पंचनामे करून त्याचे अहवाल शासनास सादर करावे, पूरग्रस्तांना सर्वतोपरी मदत करावी, अशा सूचना आमदार माणिकराव कोकाटे यांनी दिल्या. सरस्वती नदीची वेळेत दुरुस्ती न झाल्याने हा प्रकार घडल्याचे सांगत त्याने प्रशासनावर नाराजी व्यक्त केली. प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसोबतच राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सदैव तत्पर असून गरज पडल्यास आपल्याशी वैयक्तिक संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले.

शहरातील पडकी वेस, नाशिक वेस, बाजार वेस व देवी रोड परिसरातील पुराने झालेल्या नुकसानीची आमदार कोकाटे, माजी जि. प. सदस्य सिमंतीनी कोकाटे यांनी अधिकाऱ्यांसमवेत पाहणी केली. त्यानंतर नगरपालिका सभागृह झालेल्या पत्रकार परिषदेत नुकसानग्रस्तांना मदत करण्याचे आश्वासन दिले. खासदार पूल, नवापूल, पडकीवेस भागातील पुलांची उंची वाढवण्यासाठी नियोजन करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. पंचनाम्यासाठी नगरपालिकेचे १०, तहसीलचे १० असे २० कर्मचारी पंचनामे करतील. जिल्हाधिकाऱ्यांमार्फत त्याचा अहवाल पुनर्वसनमंत्र्यांसोबतच नगरविकास खात्याला पाठवण्याच्या सूचना दिल्या. यावेळी उपविभागीय अधिकारी अर्चना पठारे, पोलिस उपधीक्षक सोमनाथ तांबे, प्रभारी तहसीलदार सागर मुंदडा, मुख्याधिकारी संजय केदार आदी अधिकारी उपस्थित हाेते.

बातम्या आणखी आहेत...