आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:कळवण व सुरगाण्यात होणार 4 सांस्कृतिक भवन; आदिवासींना मिळणार हक्काचे व्यासपीठ, एक कोटी 85 लाखांच्या निधीस मंजुरी

कळवण11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शासनाच्या आदिवासी विकास विभागाकडून कळवण व सुरगाणा या आदिवासी तालुक्यांत चार स्वतंत्र सांस्कृतिक भवन मंजूर झाले आहेत. बांधकामासाठी एक कोटी ८५ लाख रुपयांच्या निधीस प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. दोन्ही तालुक्यांतील आदिवासी बांधवांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होऊन कला व सांस्कृतिक क्षेत्राला सुगीचे दिवस येतील.

कळवण व सुरगाणा तालुक्यात ज्ञानदानातून आदिवासी जनतेला समाजाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी शासन स्तरावरून सातत्याने प्रयत्न होत आहेत. यासाठी माजी आदिवासी विकासमंत्री कै. ए. टी. पवार यांनी स्वतंत्र आदिवासी विकास विभागाची स्थापना करून त्या अंतर्गत शासकीय आश्रमशाळांचे जाळे आदिवासी भागात विनले आहे. त्यामुळे येथे राहणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे मिळत आहेत.

येथील विद्यार्थी हे सर्वगुणसंपन्न असल्याने त्यांना जर हक्काचे व्यासपीठ मिळाले तर त्यांच्या कलागुणांना वाव मिळेल ही गोष्ट आमदार नितीन पवार यांनी टिपली व दोन्ही तालुक्यांत आदिवासी विकास भवन व सांस्कृतिक भवन करण्यासाठी पाठपुरावा केला. यामुळे कळवण तालुक्यात अभोणा व मानूर येथे व सुरगाणा तालुक्यात सुरगाणा शहर व उंबरठाण येथे सांस्कृतिक भवन मंजूर झाले आहेत. त्यासाठी निधीची तरतूद करून त्यास प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. यामुळे लवकरच या कामांना सुरुवात होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...