आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विधायक उपक्रम:ही मायभूमी, ही जन्मभूमी, ही कर्मभूमी आमुची..; महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त संस्था आणि शाळांमध्ये विविध कार्यक्रमांची रेलचेल

येवला12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य दादासाहेब मामुडे, उपप्राचार्य सुनील बागुल यांच्या हस्ते राष्ट्रीय ध्वजाचे पूजन करून ध्वजारोहण करण्यात आले. शैलेंद्र गायकवाड यांनी महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे महत्त्व विशद केले. वर्गातील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक करून भविष्यातील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या. विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना वार्षिक गुणपत्रके वाटप करण्यात आली. यानंतर सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रगती पुस्तक वाटप करण्यात आले.

आभार प्रदर्शन शैलेश गायकवाड यांनी केले. कार्यक्रमास उपप्राचार्य सुनील बागूल, विज्ञान विभागाचे पर्यवेक्षक प्रा. चंद्रशेखर जोशी, दीपक सूर्यवंशी, मधुकर आहेर व विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी व विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...