आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलन:शाकंबरी नदीवर पुलासाठी तिरडी आंदोलन

नांदगाव5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील मुख्य स्मशानभूमीकडे जाणाऱ्या मार्गावरील शाकंबरी नदीवर पूल बांधून देण्याच्या मागणीसाठी नागरिकांसह महिलांनी तिरडी आंदाेलन केले. दरम्यान, उपविभाग मालेगावचे तांत्रिक सहायक एस. डी. मोरे यांनी आंदाेलनकर्त्यांची भेट घेतली. त्यांनी पुलाच्या बांधकामासाठी अडथळा ठरणारी नदीपात्रात असलेली ५६ खेडी पाणीपुरवठा योजनेची वाहिनी स्थलांतरित करण्यासाठी अंदाजपत्रक सादर केले जाईल, निधी उपलब्ध झाल्यावर तातडीने काम केले जाईल, असे आश्वासन दिल्यावर आंदोलन मागे घेण्यात आले.

आंदोलनात वाल्मीक टिळेकर, विजय पाटील, संतोष गुप्ता, जगताप, विशाल वडघुले, प्रवीण सोमासे, सागर आहेर, विलास भावसार, अवी महाजन, शरद महाजन, मधुकर खैरनार, गंगा जाधव, श्रावण आढाव, अशोक पाटील, बाळासाहेब देहाडराय, समाधान आहेर, बापू वडाळकर, राजाराम खैरनार, ज्ञानेश्वर गांगुर्डे, प्रकाश चव्हाण, पंडित गायकवाड, अर्जुन गायकवाड, निंबा वडाळकर, बापू सोमासे, भागिनाथ सोर, बाळासाहेब महाजन, अंबादास महाजन, पवन खैरनार, तानाजी शेवाळे, महादू खैरे, संदीप शेवाळे, बाळू सोमासे, रवींद्र सोनवणे, बळी चौधरी, आक्काबाई सोनवणे, आक्काबाई चव्हाण, सुमन जाधव, रत्ना यादव, मनीषा चौधरी, संगीता जगताप, वंदनाबाई इप्पर, नीता इप्पर, अर्चना सानप, वर्षा निकम, प्रियंका सूर्यवंशी, पूजा सावंत यांनी सहभाग घेतला.

मागणीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष
जुना पांझण रस्ता, वडाळकर, पठाडे, आदिवासी वस्ती व स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यावर असलेल्या शाकंबरी नदीवर पूल नसल्याने ताे व रस्ता बांधून देण्याची येथील नागरिकांची जुनी मागणी आहे. मागणीकडे प्रशासन लक्ष देत नसल्याने नागरिकांनी आक्रमक होत प्रतीकात्मक तिरडी आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधले.

बातम्या आणखी आहेत...