आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणुक:त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तीन ग्रामपंचायती अविरोध; माघारीनंतर 51 सरपंचपदासाठी 205 उमेदवार रिंगणात

हरसूल2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ५७ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम मुदतीत सदस्यपदासाठी ८८६ उमेदवारांनी तर सरपंचपदासाठी २७६ उमेदवारांनी अर्ज दाखल केले हाेते. शनिवारी (दि. १) माघारीच्या अंतिम मुदतीत सदस्यपदाच्या १८९ उमेदवारांनी माघार घेतल्याने २६१ उमेदवारांची अविराेध निवड झाली तर ४३६ उमेदवार रिंगणात आहेत. सरपंचपदाच्या ६५ उमेदवारांनी माघार घेतली. सहा ठिकाणी सरपंचपदासाठी प्रत्येकी एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची अविराेध निवड झाल्याने आता २०५ उमेदवार रिंगणात आहेत. माघारीच्या मुदतीत विराेधकांची मते वळविण्यात नेत्यांना यश आल्याने तीन ग्रामपंचायती अविराेध झाल्या. आता ५४ ग्रामपंचायतीच चूरस आहे.

थेट जनतेतून सरपंच होण्याच्या निर्णयामुळे सरपंचपदासाठी इच्छुकांची भाऊ गर्दी झाली आहे. थेट सरपंचपदासाठी अनेक इच्छुक उमेदवारांनी अर्ज केल्याने ५७ ग्रामपंचायतींसाठी २७६ उमेदवारांनी अर्ज केले हाेते. सहा ग्रामपंचायतीत सरपंचपदासाठी प्रत्येकी एकच अर्ज असल्याने त्यांची अविरोध निवड झाली. ६५ उमेदवारांनी माघार घेतल्याने आता २०५ उमेदवार सरपंचपदाच्या शर्यतीत आहेत.

जातेगाव खुर्द, पिंपळद, सारस्ते या ग्रामपंचायती अविराेध झाल्या आहेत. कचुरली, पिंप्री(त्र्यं.), शिरसगाव (त्र्यं) या ग्रामपंचायतीत सरपंचांची अविरोध निवड झाली.भूतमोखाडा, जातेगाव खुर्द, पेगलवाडी, सापतपाली, हातलोंधी या ग्रामपंचायतींत सदस्यांची अविरोध निवड झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...