आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाहणी:चिंचखेडला आढळले‎ बिबट्याचे तीन बछडे‎

दिंडोरी‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील चिंचखेड येथील‎ बहादूर शिवारात माजी सरपंच‎ निवृत्ती मातेरे यांच्या उसाच्या शेतात‎ बिबट्याचे २५ ते ३० दिवसांचे तीन‎ बछडे आढळून आले.‎ वन्यजीवरक्षक किरण कांबळे,‎ जीवन सताळे यांनी बिबट्याच्या‎ बछड्यांपासून नागरिकांना दूर करत‎ त्यांच्या संरक्षणासाठी वनविभागाला‎ पाचारण केले. उपवनसंरक्षक उमेश‎ वावरे व सहायक वनसंरक्षक संजय‎ मोरे, वनपरिक्षेत्र अधिकारी पूजा‎ जोशी यांनी घटनास्थळी हजर होत‎ बछड्यांची पाहणी केली.‎ ग्रामस्थांना परिसरापासून दूर ठेवत‎ बछड्यांजवळ सीसीटीव्ही कॅमेरे‎ लावले.

मादी बिबट्या रात्री‎ साडेदहाच्या दरम्यान कॅमेऱ्यात कैद‎ झाली. या पिल्लांना तिने दूध पाजले.‎ तोंडात बछड्यांना घेऊन त्या‎ ठिकाणाहून निघून गेली.‎ पोलिसपाटील सोनवणे यांच्या‎ मेंढ्यांच्या कळपामधून मेंढरू ओढून‎ नेत बिबट्याने फडशा पाडला हाेता.‎ पाळीव कुत्र्यांचीही शिकार केली‎ हाेती. वनविभागाने लवकरात‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ लवकर पिंजरा लावून बिबट्याला‎ जेरबंद करावे, अशी मागणी माजी‎ पंचायत समिती सदस्य सुनील‎ मातेरे, कादवा कारखान्याचे‎ संचालक रावसाहेब पाटील,‎ त्र्यंबकराव पाटील, सुभाष मातेरे‎ यांनी केली आहे.‎

अंबोलीत‎ आढळला‎ मृतावस्थेत बिबट्या
‎त्र्यंबकेश्वर | तालुक्यातील अंबोली‎ शिवारात एका शेतात शनिवारी‎ दुपारी बिबट्या मृतावस्थेत दिसून‎ आला. स्थानिकांनी याबाबतची‎ माहिती वनविभागास कळवल्यावर‎ वनकर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष जागेवर जात‎ पाहणी करुन मृत बिबट्याच्या‎ शवविच्छेदनासाठी नाशिकला‎ आणले. चिकित्सेनंतरच बिबट्याचा‎ मृत्यू कशामुळे झाला हे समजू‎ शकणार आहे. काही दिवसांपूर्वी‎ याच परिसरातील वाळुंज येथे‎ बिबट्याने लहान मुलाला ठार मारले‎ होते. शनिवारी मृतावस्थेत‎ आढळलेला बिबट्या हा ताेच अाहे‎ की वेगळा आहे, याचीच चर्चा‎ परिसरातील ग्रामस्थांमध्ये सुरू होती.‎

बातम्या आणखी आहेत...