आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवेदन:दाेन महिन्यांपासून थ्री फेज वीज गायब; ठाणगावला उद्या आंदोलन

सिन्नर24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ठाणगाव येथील भिकरवाडी ट्रान्सफाॅर्मरवरील दोन दिवसांपासून थ्री फेज वीज बंद पडली आहे.‌ तर आठ दिवसांपासून सिंगल फेजही गायब झाली आहे. वारंवार विनवण्या करूनही महावितरणकडून दुरुस्ती केली जात नसल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे ठाणगाव येथे वीज वितरण कंपनीच्या विरोधात सोमवारी (दि. १२) रास्ता रोको करण्यात येणार आहे. अभियंता ए. पी. कुलकर्णी यांना यासंदर्भात निवेदन देण्यात आले.

या ट्रान्सफाॅर्मरवरील ३५ घरगुती वीज ग्राहकांनी व ५ कृषी ग्राहकांनी संपूर्ण वीजबिले वेळोवेळी भरलेली असूनही संपूर्ण परिसर अंधारात आहे. याच परिसरात मागील आठवड्यात बिबट्याने दोन पोल्ट्री फार्ममधील १५० पेक्षा अधिक कोंबड्या फस्त केल्या आहे. परिसरात आताही बिबट्याचा वावर आहे. दोन दिवसांत ट्रान्सफाॅर्मर सुरू न झाल्यास वीज वितरणच्या निषेधार्थ ठाणगाव येथे सोमवार सकाळी १० वाजता रास्ता रोको करण्यात येणार आहे. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष जयराम शिंदे, गणेश शिंदे, शिवाजी पाटोळे, शांताराम पाटोळे, रोहन शिंदे, अंकुश शिंदे, संजय काकड उपस्थित होते.

ग्राहक मंचकडे तक्रार करणार
वीज कनेक्शन घेतल्यापासून एकदाही घराचे व कृषीचे बिल थकवले नाही. शेतीची वीज ६० दिवसांपासून तर घराची ८ दिवसांपासून गायब आहे. दोन दिवसांत पुरवठा सुरळीत न झाल्यास ग्राहक मंचाकडे तक्रार नोंदवून नुकसानभरपाईची मागणी करणार आहे.
संजय काकड, अन्यायग्रस्त शेतकरी

बातम्या आणखी आहेत...