आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुकाने जळून खाक:मनमाड चौफुलीवर आगीत तीन दुकाने जळून खाक; अग्निशमन अधिकारी संजय पवार यांनी तातडीने सहा बंब घटनास्थळी रवाना केले

मालेगाव22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मनमाड चौफुली परिसरात शुक्रवारी सकाळी लागलेल्या आगीत तीन दुकाने जळून खाक झाली. दुकानांमध्ये जुने टायर, कागदांचे साहित्य व स्टील होते. अग्निशमन दलाने सहा बंबांद्वारे दहा फेऱ्या करत पाच तासांनंतर आगीवर नियंत्रण मिळविले. सुदैवाने आगीत कुठलीही जिवीत हानी झाली नाही.

चौफुलीवर एकाच रांगेत पत्र्याने बनविलेली दहा दुकाने आहेत. उस्मान गनी शेख यांच्या मालकीच्या टायर दुकानातून सकाळी अकरा वाजता धूर निघत असल्याचे नागरिकांच्या लक्षात आहे. टायर पेटल्याने शेजारील संजय येवले यांचे रूपेश ट्रेडिंग व सोहेल कच्छी यांचे स्टील दुकानही आगीच्या विळख्यात सापडले. अवघ्या काही वेळात दुकानांमधून आगीचे लोळ बाहेर पडू लागले. नागरिकांनी घटनेची माहिती अग्निशमन दलास दिली. अग्निशमन अधिकारी संजय पवार यांनी तातडीने सहा बंब घटनास्थळी रवाना केले.

चौफेर पाण्याचा मारा केल्याने आग काही वेळाने नियंत्रणात आली. आग पूर्णपणे विझविण्यासाठी पाच तासांचा अवधी लागला. आगीत दुकानातील साहित्य जळून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. दुकानांच्या पाठीमागे शेती आहे. शेतातील वाळलेल्या गवताला आग लागून ती दुकानांपर्यंत पोहोचल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

बातम्या आणखी आहेत...