आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई-आग्रा महामार्गावर नवीन कसारा घाटात चालत्या ट्रकने पेट घेतल्याची घटना बुधवारी सकाळी ६.३०च्या सुमारास घडली. मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर नाशिकहून मुंबईला जाणारा मालवाहू ट्रकने (एमएच ०३ सीपी ६१७१ ) कसारा घाट उतरत असताना अचानक पेट घेतला.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलिस केंद्र, घोटी, टोल प्लाझा, इगतपुरी नगरपरिषदेचे अग्निशमन दल कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले. दोन वेळा विझवण्याचा प्रयत्न करूनही पुन्हा हा ट्रक पेटला. यामध्ये ट्रक भस्मसात झाला आहे. प्रसंगावधान राखत ट्रक चालकाने ट्रकला बाजूला लावून पलायन केल्याने त्याचा जीव वाचला. या घटनेमुळे मुंबई-आग्रा महामार्गावरील वाहतूक काही वेळ विस्कळीत झाली होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.