आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सूचना:लंपी स्किनपासून जनावरे वाचविण्यासाठी जि. प.ने तातडीने उपाययोजना कराव्यात

सिन्नर22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतीचे अतोनात नुकसान झालेले असतानाच आता जनावरे लंपी स्किन आजाराने त्रस्त होत आहे. दुहेरी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांकडील जनावरे वाचवण्यासाठी तत्काळ उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सिमंतिनी कोकाटे यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांच्याकडे केली आहे. बनसोड यांनी तत्काळ पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून लसीकरणाचा वेग वाढविण्याच्या सूचना केल्या.

सिन्नर तालुक्यात बहुतांश शेतकऱ्यांचा दुग्धव्यवसाय आहे. मात्र, लंपी नावाच्या विषाणूजन्य आजाराची अनेक जनावरांना लागण होत आहे. अतिवृष्टीमुळे सिन्नर तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांचे पीक पाण्यातच सडून गेले आहे. त्या धक्क्यातून शेतकरी सावरत नाही तोच लंपी आजाराने शेतकऱ्यांची जनावरे बाधित होत आहेत. त्यातून हातचे पशुधन गेले तर शेतकरी पूर्णतः कोलमडून पडेल. शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी हे पशुधन वाचविणे गरजेचे आहे, ही बाब ओळखून कोकाटे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांना सिन्नर तालुक्यात लसीकरणाचा वेग वाढविण्याची मागणी करत याबाबतचे निवेदन देत चर्चा केली. त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी उपाययाेजना करण्याचे आश्वासन दिले.

लसीकरण वाढविणे हाच उपाय
शेजारील नगर जिल्ह्यानंतर आता सिन्नर तालुक्यातही जनावरांमध्ये लंपी आजाराचे विषाणू मोठ्या प्रमाणावर आढळत आहेत. लसीकरण हाच त्यावर प्रभावी उपाय असल्याने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे लसीकरणाचा वेग वाढविण्याची मागणी केली. शेतकऱ्यांनीही सध्या आपली जनावरे बाजारात नेऊ नये.
सिमंतिनी कोकाटे, माजी जिल्हा परिषद सदस्या

बातम्या आणखी आहेत...