आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणूक:मुख्य निवडणूक शाखा कार्यालयाकडे ; मालेगाव महापालिकेच्या प्रारूप प्रभागरचनेवर 43 हरकती प्राप्त

मालेगाव13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महापालिकेच्या प्रारूप प्रभागरचनेवर ४३ हरकती प्राप्त झाल्या आहेत. मनपाच्या मुख्य निवडणूक शाखा कार्यालयाकडे सर्वाधिक १३ हरकती आल्या आहेत. प्राप्त हरकतींवर पुढील महिन्यात २ जुलै रोजी सुनावणी होणार आहे. मनपा निवडणूक कार्यक्रम घोषित नसला तरी प्रशासनाच्या निवडणूक शाखेने पूर्वतयारी सुरू केली आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात प्रभागरचनांची प्रारूप यादी सीमारेषांसह प्रसिद्ध करण्यात आली होती. या रचनेवर हरकती व सूचना स्वीकारण्यासाठी २० जूनची अंतिम मुदत देण्यात आली होती. या मुदतीत ४३ हरकती प्रशासनाकडे सादर झाल्या आहेत. प्रभाग एक कार्यालयाकडे १३, प्रभाग दाेन कार्यालयास पाच, प्रभाग तीनकडे दोन, प्रभाग चारकडे सात, मनपा निवडणूक शाखा कार्यालयास १६ हरकती आल्या आहेत. प्रभागरचना सुसंगत नसल्याच्या बऱ्याच हरकती आहेत.

हरकती दाखल करणाऱ्यांमध्ये भाजप, एमआयएम, राष्ट्रवादी काँग्रेस, जनता दल या पक्षाचा समावेश आहे. नगरसेवक अब्दुल माजिद युनूस ईसा शेख, अब्दुल बाकी राशनवाला, साजिद अब्दुल रशिद मुकादम, माजी नगरसेवक रफिक शेख, निसार शेख, शकील जानी बेग, दिनेश कन्हैयालाल यादव आदींनी हरकती नाेंदविल्या आहेत. २ जुलैला सुनावणी झाल्यानंतर ६ जुलै रोजी अंतिम प्रभागरचना जाहीर केली जाणार आहे.

२०११ च्या लोकसंख्येनुसार रचना
प्रभागरचना करताना २०११ च्या जनगणनेची लोकसंख्या विचारात घेण्यात आली आहे. रचनेनुसार एकूण ३२ प्रभाग तयार झाले आहेत. यात ३१ प्रभाग त्रिसदस्यीय तर एक प्रभाग द्विसदस्य आहे. नगरसेवकांच्या संख्येत वाढ झाल्याने आता ९५ सदस्य निवडून जातील. एकूण लोकसंख्या पाच लाख ९० हजार ९९८ इतकी आहे.

बातम्या आणखी आहेत...