आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आदित्य ठाकरे:पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे आज इगतपुरी दौऱ्यावर

घोटी2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

इगतपुरी तालुक्यातील खंबाळे ग्रामपंचायत येथे एक कोटी ९२ लाखांच्या पाणीपुरवठा योजनेसंदर्भात सकाळी १०.३० वाजता पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे भेट देणार असून स्थानिक नागरिकांशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर त्र्यंबकेश्वरकडे प्रयाण करणार आहेत. यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ, केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार उपस्थित राहणार आहेत. यावेळी मतदारसंघातील विविध प्रश्न जाणून घेणार आहेत. तालुक्यातील सर्व शिवसैनिक व पदाधिकाऱ्यांनी खंबाळे-डहाळेवाडी येथे मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन माजी आमदार काशीनाथ मेंगाळ व समाजकल्याण सभापती सुशीला मेंगाळ यांनी केले आहे. खंबाळे ग्रामपंचायतच्या वतीने सरपंच, उपसरपंच व सदस्य यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले आहे.

बातम्या आणखी आहेत...