आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चाेरी:मालेगाव तहसील आवारातून जप्त ट्रॅक्टर व ट्राॅलीची चाेरी

मालेगाव3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महसूलच्या प्रशासकीय कारवाईत जप्त केलेला ट्रॅक्टर व ट्राॅली अज्ञात चाेरट्याने लंपास केली. हा प्रकार शनिवारी मध्यरात्री घडला. या घटनेमुळे तहसील कार्यालयाच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला आहे.बेकायदा वाळू, मुरुम वाहतूक करणारी वाहने जप्त करून तहसीलच्या आवारात उभी करण्यात आली आहे. कुणीतरी अज्ञात चाेरट्याने रात्रीच्या वेळी कार्यालयाच्या आवारातील पूर्वेकडील भिंतीच्या मुख्य गेटचा कडीकाेयंडा ताेडून आत प्रवेश केला.

तीन लाख रुपये किमतीचा महिंद्रा कंपनीचा ट्रॅक्टर व ट्राॅली चाेरून पलायन केले. रविवारी दुपारी ट्रॅक्टर व ट्राॅली चाेरीस गेल्याचे समजल्याने मंडल अधिकारी लक्ष्मण मधुकर निकम यांनी छावणी पाेलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

बातम्या आणखी आहेत...