आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहर व परिसरात रविवारी (दि. १२) सायंकाळी पाच ते पावणे सहा वाजेच्या दरम्यान जोरदार पावसाने हजेरी लावली. बाजार समितीच्या पर्जन्यमापकावर पाऊणतासात एक इंच ४४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. अचानक आलेल्या पावसाने बाजार समितीच्या आवारात व्यापारी वर्गाचा उघड्यावर असलेला मका भिजल्याने नुकसान झाले आहे.
रविवारी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने लासलगाव जलमय झाले. विंचूर रोड, कोटमगाव रोड, स्टेशन रोड परिसरातील अनेक दुकानांमध्ये पाणी घुसले. आठवडे बाजारावर या पावसाचा परिणाम जाणवला. बाजार समितीच्या मुख्य बाजार आवाराच्या पाठीमागे असलेल्या धान्य बाजार आवारात उघड्यावर अनेक व्यापारी वर्गाचा मका पडलेला होता. या दमदार पावसाने मोठ्या प्रमाणात मका भिजल्याने व्यापारी वर्गाचे नुकसान झाले आहे.
नामपूर
नामपूरसह परिसरात सलग दुसऱ्या दिवशीही पावसाने दमदार हजेरी लावल्याने परिसरातील रस्त्यांना तळ्याचे स्वरुप आले होते. दुपारी जोरदार सरी कोसळल्याने नामपूरसह परिसरातील शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचले. अनेक ठिकाणी शेतातील बांध फुटून माती पूर्णपणे वाहून गेली आहे. शिवमनगर, नामपूर पेट्रोल पंप, बसस्थानक परिसर, नववसाहतीमध्ये पाणी साचल्याने रस्ते जलमय झाले. नामपूर- ताहाराबाद, नामपूर - साक्री रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात पाणी साचल्याने अनेक दुचाकी चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. जोरदार पावसाने रस्त्यांना दर्जा प्रमाणपत्र दिले आहे. सलग दुसऱ्या दिवशीही पावसाने हजेरी लावल्याने परिसरातील बळीराजा सुखावला आहे. सलग दोन तास जोरदार पाऊस झाल्याने हवेत गारवा निर्माण झाला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.