आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मतदान:1300 कर्मचाऱ्यांना मतदान प्रक्रियेचे प्रशिक्षण ; कर्मचारी दोन टप्प्यांत झाले सहभागी

बोरगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुरगाणा तालुक्यातील ६१ ग्रामपंचायतींपैकी ५९ ग्रामपंचायतींसाठी १६ ऑक्टोबरला होणाऱ्या मतदानासाठी मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकाऱ्यांसाठी मंगळवारी (दि. ५) प्रशिक्षण पार पडले. या प्रशिक्षणात तहसीलदार सचिन मुळीक, मास्टर ट्रेनर नरेंद्र सोनवणे यांनी प्रोजेक्टरद्वारे मार्गदर्शन व प्रत्यक्ष मशीन हाताळणीचे प्रशिक्षण दिले. यात केंद्राध्यक्ष, कर्मचारी श्रेणी १, २, ३, ४ चे एकूण १३०० कर्मचारी दोन टप्प्यांत सहभागी झाले होते.

बातम्या आणखी आहेत...