आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानाशिक ग्रामीण पाेलिस दलातील २९ अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. यात २२ पाेलिस निरीक्षक व सात सहायक पाेलिस निरीक्षकांचा समावेश आहे. इगतपुरी व ओझर पाेलिस ठाण्यांच्या निरीक्षकांवर कामकाजात गंभीर कसूर केल्याचा ठपका ठेवून त्यांची नाशिक नियंत्रण कक्षात उचलबांगडी करण्यात आली. दरम्यान, बदली झालेल्या इतर सहा अधिकाऱ्यांना पदस्थापनेची प्रतीक्षा असून त्यांच्या पदस्थापनेचे स्वतंत्र आदेश निर्गमित केले जातील.
कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने विनंती तसेच प्रशासकीय कारणांमुळे रिक्त पदांवर अधिकाऱ्यांना बदलीने पदस्थापना देण्यात आली आहे. जिल्हास्तरीय पाेलिस आस्थापना मंडळास प्रदान केलेल्या अधिकारानुसार पाेलिस अधीक्षक शहाजी उमाप यांनी बुधवारी बदल्यांचे आदेश जारी केले आहेत.
नाशिक नियंत्रण कक्षातील १३ अधिकाऱ्यांकडे स्वतंत्र पाेलिस ठाण्यांची धुरा साेपविण्यात आली आहे. बदलीने पदस्थापना मिळालेल्या अधिकाऱ्यांना तात्काळ बदलीच्या ठिकाणी रुजू हाेण्याचे निर्देश दिले आहे. पाेलिस निरीक्षक संदीप रणदिवे, अनिल भवारी, दिगंबर भदाणे, सहाय्यक निरीक्षक प्रल्हाद गिते व सागर काेते यांना पदस्थापनेची प्रतिक्षा आहे. इगतपुरीचे निरीक्षक वसंत महादू पथवे व ओझरचे निरीक्षक अशाेक रहाटे यांची कामकाजातील गंभीर कसुरीमुळे नाशिक नियंत्रण कक्षात बदली झाली आहे.
दाेघांची उचलबांगडी तर सहा अधिकाऱ्यांना पदस्थापनेची प्रतीक्षा
पाेलिस निरीक्षक अशाेक कचरू पवार (पिंपळगाव बसवंत) पाेलिस निरीक्षक बिपीन पांडुरंग शेवाळे (त्र्यंबकेश्वर) पाेलिस निरीक्षक बापू शांताराम महाजन (निफाड) पाेलिस निरीक्षक राजेंद्र दामाेदर कुटे (सिन्नर) पाेलिस निरीक्षक श्याम काळू निकम (एमआयडीसी सिन्नर) पाेलिस निरीक्षक बाळासाहेब भाऊसाहेब थाेरात (मनमाड) पाेलिस निरीक्षक नंदकुमार माेहनराव कदम (येवला शहर) पाेलिस निरीक्षक पंढरीनाथ रघुनाथ ढाेकणे (छावणी, मालेगाव) पाेलिस निरीक्षक जयराम रामदास छापरिया (किल्ला, मालेगाव) पाेलिस निरीक्षक शिवाजी मुरलीधर बुधवंत (मालेगाव शहर) पाेलिस निरीक्षक दाैलत शिवराम जाधव (आझादनगर, मालेगाव) पाेलिस निरीक्षक यशवंत भाऊराव बाविस्कर (रमजानपुरा) पोलिस निरीक्षक समीर नवनाथ बारावकर (देवळा) पाेलिस निरीक्षक दुर्गेश माेहनलाल तिवारी (ओझर) पाेलिस निरीक्षक राजू संपत सुर्वे (इगतपुरी) सहायक निरीक्षक गणेश शिवाजी म्हस्के (हरसूल) सहायक निरीक्षक चेतन केदारी लाेखंडे (वावी) सहायक निरीक्षक पुरुषाेत्तम आधार शिरसाठ (जायखेडा) सहायक निरीक्षक मनाेज पवार (वडनेर खाकुर्डी)
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.