आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशासकीय सेवेचा निर्धारित कालावधी पूर्ण झालेल्या राज्यभरातील २२५ पाेलिस निरीक्षकांचे शुक्रवारी (दि. ९) बदली आदेश जारी झाले आहेत. यात नाशिक ग्रामीणच्या सटाणा, आझादनगरसह नाशिक नियंत्रण कक्षाचे दाेन तर मालेगाव नियंत्रण कक्षातील एक अशा पाच पाेलिस निरीक्षकांचा समावेश आहे.
जिल्ह्यात चार तर आयुक्तालय स्तरावर सहा वर्षांचा सेवाकाळ पूर्ण करणाऱ्या पाेलिस निरीक्षकांच्या बदल्या प्रलंबित हाेत्या. नियमानुसार सदर बदल्या ३० मेपर्यंत हाेणे अपेक्षित हाेते. मात्र, सत्तांत्तरनाट्यामुळे प्रशासकीय बदल्यांना ब्रेक लागला हाेता. अखेर शुक्रवारी गृह विभागाने संबंधित अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले आहेत. मालेगाव नियंत्रण कक्षाचे निरीक्षक दिलीपकुमार पारेकर यांची उस्मानबादला बदली झाली. मालेगावच्या आझादनगरचे निरीक्षक अशाेक रत्नपारखी यांची बुलडाणा, सटाण्याचे निरीक्षक सुभाष अनमूलवार यांची परभणी, नाशिक नियंत्रण कक्षाशी संलग्न असलेले निरीक्षक सुरेश सपकाळेंची नाशिक तर निरीक्षक भाऊसाहेब पटारे यांची पुणे शहरात बदली करण्यात आली. राज्यभरातील २२५ पाेलिस निरीक्षकांना बदलीने पदस्थापना देण्यात आली आहे. अधिकाऱ्यांना बदलीच्या ठिकाणी तातडीने रुजू हाेण्याचे आदेश आहेत.
बदली विनंतीची दखल नाही : बदली आदेशात नेमणूक केलेल्या ठिकाणात अंशत: बदल करणे, बदली रद्द करणे, स्थगिती देणे, अशा प्रकारच्या विनंत्यांची या कार्यालयातर्फे दखल घेतली जाणार नाही. बदली झालेले पोलीस अधिकारी आदेशाचे पालन करुन नवीन नेमणूक दिलेल्या ठिकाणी सर्वप्रथम हजर होतील. व तेथील प्रमुखांमार्फत त्यांची विनंती नव्याने या कार्यालयास सादर करतील. नविन संबंधित प्रमुखांच्या शिफारशीशिवाय विनंतीचा विचार केला जाणार नाही. याची संबंधीत पोलीस अधिकाऱ्यांना लेखी सूचना द्यावी, असे आदेशात नमूद केले आहे.
३२ निरीक्षक लवकरच पदाेन्नतीच्या कक्षेत नि:शस्त्र ३२ पाेलिस निरीक्षक हे पाेलिस उपअधीक्षक व सहाय्यक पाेलिस आयुक्त पदाच्या पदाेन्नती कक्षेत आहेत. या निरीक्षकांची यादी जाहीर झाली असून त्यांना लवकरच पदाेन्नतीवर पदस्थापना दिली जाणार आहे. निरीक्षक आनंदा वाघ (नाशिक शहर), किरण साळवी (पाेलिस अकॅडमी नाशिक) व सीताराम काेल्हे (नाशिक शहर) यांचा समावेश आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.