आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशासनाच्या वेगवेगळ्या हेडच्या माध्यमातून जास्त निधी उपलब्ध करून या भागातील दळणवळणाच्या सुविधा अधिक सुखकर करण्याची ग्वाही माजी जिल्हा परिषद सदस्या सिमंतिनी कोकाटे यांनी दिली.सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभागाकडून मंजूर करण्यात आलेल्या सिन्नर विधानसभा मतदारसंघातील भरवीर बुद्रुक ते निनावी, पिंपळगाव डुकरा या रस्त्याच्या मजबुतीकरण आणि डांबरीकरण कामाचा शुभारंभ प्रसंगी त्या बोलत होत्या.
आमदार माणिकराव कोकाटे यांच्या प्रयत्नातून राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत साकूर फाटा ते पिंपळगाव डुकरा, घारगाव, निनावी ते भरवीर बुद्रुक या प्रस्तावित जिल्हा मार्ग-२२ च्या ० ते ८.५ किलोमीटर रस्त्याचे मजबुतीकरण आणि डांबरीकरणाच्या कामासाठी सुमारे दाेन कोटी ५६ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या रस्त्याचे मजबुतीकरण झाल्यानंतर पिंपळगाव डुकरा, पिंपळगाव घाडगा, निनावी, भरवीर बुद्रुक, भंडारवाडी, अडसरे बुद्रुक या गावांना गावातील नागरिकांची दळणवळणाची गैरसोय दूर होणार आहे.
याप्रसंगी बाळासाहेब गाढवे, पांडुरंग वारुंगसे, सुनील वाजे, नामदेव भोसले, विजय जाधव, केरू दादा खतेले, दौलत बांबळे, रतन बांबळे, देवीदास देवगिरे, भगवान जुंद्रे, अरुण घोरपडे, साहेबराव झणकर, नामदेव वाकचौरे, भगवान वाकचौरे, राजू घोडे, संजय जाधव, संतोष साबळे, आमदार कोकाटे यांचे स्वीय सहायक संजय डावरे आदींसह परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.