आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Nashik
  • Malegaon
  • Tree Conservation Through Initiatives Of Three Social Organizations In Sinnar Taluka; Conservation Of 21,000 Trees Including Three Dense Forests Through Labor |marathi News

पर्यावरण दिन विशेष:सिन्नर तालुक्यात तीन सामाजिक संस्थांच्या पुढाकारातून वृक्षसंवर्धन; 21 हजार झाडांची जोपासना

सिन्नरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यात तीन सामाजिक संस्थांच्या पुढाकारातून पाच वर्षांत तीन घनवनांसह २१ हजार झाडांची यशस्वी लागवड करण्यात आली आहे. संपूर्णपणे श्रमदानातून झालेल्या वृक्षसंवर्धनाच्या या कामाला ९७ टक्के यश आले आहे. पर्यावरण संवर्धनासाठी भारावलेल्या नागरिकांकडून हाती घेण्यात आलेले उपक्रम कमालीचे यशस्वी ठरले आहेत. यात मियावाकी पद्धतीच्या जंगलासह देवराई ऑक्सिजन पार्कचा समावेश आहे. दरम्यान, वनप्रस्थ फाउंडेशन व सिन्नर नगरपरिषद यांच्या वतीने साकारण्यात येणाऱ्या राज्यातील शंभराव्या देवराईत रविवारी (दि. ५) महावृक्षलागवड कार्यक्रम होणार आहे.

वनप्रस्थ फाउंडेशन, बारागावपिंप्री ग्रामस्थ व भोकणी ग्रामविकास मंच यांच्या माध्यमातून वृक्षलागवडीसह त्याची जोपासना करण्याचा उपक्रम सुरू आहे. लागवडीबरोबरच झाडांना पाणी, खते यांची काळजीही या संस्थातील स्वयंसेवकांकडून घेतली जात आहे. सरकारच्या ३३ कोटी वृक्षलागवड योजनेचे यश खूपच कमी असताना श्रमदानातून उभ्या राहिलेल्या संस्थांच्या या उपक्रमांनी मिळविलेले यश कौतुकास पात्र ठरत आहे.

वनप्रस्थचे घनवन अन् देवराई प्रकल्प
वनप्रस्थने कोरोनाकाळातील बंदीच्या वेळी मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करून सोनांबे शिवारातील आई भवानी डोंगराच्या उतारावर सहा हजार झाडांची लागवड केली. पाच वर्षांत झाडांना पाणी देण्यासह जोपासना करण्यात आली. याच भागात अडीच हजार झाडांचे घनवनही तयार केले. संस्थेने जिल्ह्यातील पहिला देवराई प्रकल्प हाती घेऊन तो पूर्णत्वास नेला. यात एक हजार शंभर देशी झाडांची लागवड करण्यात आली आहे.

१०० व्या देवराईत आज महावृक्षलागवड
सरदवाडी मार्गावरील देशमुख नगरात राज्यातील शंभरावी देवराई साकारण्यात येत आहे. वनप्रस्थ फाउंडेशन व सिन्नर नगरपरिषदेच्या वतीने रविवारी (दि. ५) सकाळी १० वाजता महावृक्षलागवड कार्यक्रम होणार आहे. बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपेरे यांच्या हस्ते वृक्षलागवडीला सुरुवात होईल. देवराई फाउंडेशनचे संस्थापक रघुनाथ ढोले, पर्यावरणतज्ज्ञ श्रीनिवास राव, आमदार माणिकराव कोकाटे, माजी आमदार राजाभाऊ वाजे, युवानेते उदय सांगळे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शीतल सांगळे, माजी जिल्हा परिषद सदस्य सिमंतिनी कोकाटे, वनक्षेत्रपाल मनीषा जाधव, उपविभागीय अधिकारी डॉ अर्चना पठारे, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी संजय केदार उपस्थित राहणार आहेत.

ग्रामविकास मंचने जतन केली ३५०० झाडे
भोकणी येथील ग्रामविकास मंचच्या स्वयंसेवकांनी श्रमदानातून तीन वर्षांत तीन हजार पाचशे झाडांची लागवड करून त्याची जोपासना केली आहे. गावातील मोकळे भूखंड, गावाला जोडणाऱ्या रस्त्यांच्या दुतर्फा ही झाडे लावली आहेत. सरपंच अरुण वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामस्थांच्या वाढदिवसाला झाडे लावण्याचा उपक्रम काटेकोरपणे अमलात आणला जात आहे.

बारागावपिंप्रीत जिल्ह्यातील सर्वात मोठे मियावाकी जंगल
बारागावपिंप्री येथे ग्रामपंचायत, महिला बचतगट आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या सहभागातून जिल्ह्यातील सर्वात मोठे दहा हजार झाडांचे मियावाकी जंगल (कमी जागेत दाट झाडे लावण्याचे तंत्रज्ञान) तयार होत आहे. तीन महिन्यांपूर्वीच या झाडांची लागवड पूर्ण करण्यात आली. पाणी फाउंडेशनसह विविध कंपन्यांचे सहकार्य लाभले. लोकसहभागातून झाडांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

वनप्रस्थचे घनवन अन् देवराई प्रकल्प
वनप्रस्थने कोरोनाकाळातील बंदीच्या वेळी मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करून सोनांबे शिवारातील आई भवानी डोंगराच्या उतारावर सहा हजार झाडांची लागवड केली. पाच वर्षांत झाडांना पाणी देण्यासह जोपासना करण्यात आली. याच भागात अडीच हजार झाडांचे घनवनही तयार केले. संस्थेने जिल्ह्यातील पहिला देवराई प्रकल्प हाती घेऊन तो पूर्णत्वास नेला. यात एक हजार शंभर देशी झाडांची लागवड करण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...