आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आदरांजली:देवपूर विद्यालयात मेजर ध्यानचंद यांना आदरांजली

सिन्नर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

माध्यमिक लोकशिक्षण मंडळाच्या देवपूर हायस्कूल व एस. जी. कनिष्ठ महाविद्यालयात हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त क्रीडा दिन साजरा करण्यात आला.

मुख्याध्यापक संजय जाधव यांनी ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन केले. मुलांनी मोबाइल, टीव्हीपासून दूर जात खेळाकडे लक्ष द्यावे. खेळातील कौशल्य वाढवून भविष्यात देशासाठी खेळावे व आपल्या गावचे, देशाचे नाव मोठे करावे, असे आवाहन मुख्याध्यापक जाधव यांनी केले. क्रीडाशिक्षक शंकर गुरुळे यांनी ध्यानचंद यांच्याबाबत माहिती देऊन राष्ट्रीय क्रीडा दिनाचे महत्त्व सांगितले. विद्यार्थ्यांनी आतापासूनच खेळाकडे लक्ष द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी सुनील पगार, रवींद्र कोकाटे, रामेश्वर मोगल, वैशाली पाटील, रूपेश कुऱ्हाडे, नानासाहेब खुळे, सोपान गडाख, रवींद्र गडाख, भाऊसाहेब गुरुळे, सुवर्णा मोगल, ताराबाई व्यवहारे, दत्तात्रय आदिक, सुनीता शिंदे, मंगल बोरणारे, दत्ता धरम, नारायण भालेराव, अशोक कळंबे आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...