आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:घाटात ट्रकची कारला धडक; दाम्पत्य जखमी

चांदवड11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील राहुड घाटात ट्रकने अल्टो कारला धडक दिल्याने कारमधील पती-पत्नी जखमी झाले. चांदवडकडून मालेगावकडे भरधाव जात असलेल्या ट्रकने (यूपी ७० इटी ९६५५) सोमवारी (दि. २१) रात्री ३ वाजेच्या सुमारास राहुड घाटात म्हसोबा मंदिराच्या पुढे मारुती अल्टो कारला (एमएच १८ एजे ४७२१) पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात कारमधील दाम्पत्य जखमी झाले.

याबाबत तुकाराम लक्ष्मण खंदरकर (रा. मोगलाई, धुळे) यांनी चांदवड पोलिसांत फिर्याद दिल्याने पोलिसांनी ट्रकचालक थानेश्वर श्रीरामकुमार भुंजवाह (३२, रा. जयसिंगनगर जि. शाहडोल, मध्य प्रदेश) याच्याविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलिस नाईक राजेंद्र बिन्नर करीत आहेत.घाटात गेल्या काही दिवसांपासून छाेट्या-माेठ्या अपघातांच्या संख्येत वाढ झाली असून महामार्ग प्रशासनाने त्यावर त्वरित उपाययाेजना करण्याची मागणी हाेत आहे.

बातम्या आणखी आहेत...